Being Woman

Kedarnath

‘हिमालय उत्तराखंड केदारनाथ’

काश्मीर मधला हिमालय बघितल्यानंतर आम्ही उत्तराखंडला जायचं ठरवलं आणि नेहमीप्रमाणेच आमचा आम्हीच बुकिंग करून कुठलाही टुरिस्ट ग्रुप न घेता जायचं होतं .त्यावेळेला म्हणजे १९९२ला  रेल्वेची बुकिंग चर्चगेटला मिळायची आणि तिथे  वरतीच इंडिया टुरिझमचं ऑफिस होतं . तिथे गेल्यावर  सगळी माहिती मिळायची की कुठे जा काय करा आणि ती माहिती असायची प्रिंटेड . मी आधी बुकिंग केलं  मुंबई ते दिल्ली  दिल्ली ते मुंबई .  इंडिया टुरिझम  ऑफिसमध्ये भेटले  आम्हाला बद्रीनाथ आणि केदारनाथ ला जायचे तर कसं जायचं? त्यांनी मला एक पम्पलेट  दिलं .आम्ही सगळा तो अभ्यास केला कसं करायचं काय करायचं  आम्ही दिल्लीला पोहोचलो.  आधी दोन-तीन दिवस आम्ही दिल्लीला महाराष्ट्र भवन मध्ये आम्हाला मस्त रूम ची अरेंजमेंट झाली होती आणि मग तिथे चार दिवस राहिलो दिल्लीला चार दिवस फिरलो चाट खाल्लं  खास पंजाबी  जेवण घेतलं. त्या नंतर  हरिद्वारला गेलो हरिद्वारला एक दिवस राहिलो आणि ऋषिकेश ला गेलो आम्हाला असं कळलं की ऋषिकेश वरून सगळीकडच्या बसेस सुटतात   ऋषिकेशला गेल्यानंतर  असं कळलं की   श्रीनगर म्हणून एक गाव लागते श्रीनगर वरून दोन वेगवेगळ्या ठिकाणी बद्रीनाथ आणि केदारनाथ आणि गंगोत्री जम्नोत्री बसेस जातात.

आता आधी आम्ही केदारनाथ बद्रीनाथ ला जायचं ठरवलं.   थांबत थांबत जायचं असेल तर पहिला स्टॉप  आम्हाला गोपेश्वरला घ्यायला लागेल .  तिथे आम्हाची  राहायची सोय होऊ शकते हे असं इंडिया टुरिझमच्या त्या प्रिंटमध्ये दिलेलं होतं आणि तिथूनच पुढची बुकिंग मिळतील. मग आम्ही गोपेश्वरला गेलो गोपेश्वरला गेल्यानंतर आधी  पीडब्ल्यूडी चा ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना सांगितले की आम्हाला हे पुढचे बंगले रिझर्वेशन करायचा आहे तर काय करायचं . त्यांनी आम्हाला पुढचे तीन बंगले बुकिंग करून दिले .  एक तर नगर, दुगलबिट्टा आणि  गुप्त काशी असे तिन्ही आम्ही बंगले तिथून बुक करून घेतले.  आम्ही त्यांना विचारलं की गोपेश्वर मध्ये कुठे राहायचे कारण आम्हाला नगरला जायला दुसऱ्या दिवशी बस होती .  

मी म्हटलं इथे आहे का तुमचा बंगला तर ते म्हणे हो आहे पण बुक असेल बघतो आणि त्यांनी सांगितलं आहे आजच्या दिवसासाठी एक रूम आहे.  त्यांनी आम्हाला तो बंगल्यामध्ये रिझर्वेशन दिलं आणि तो बंगला इतका सुंदर जागी होता आणि त्या दिवशी संध्याकाळी नेमका ढग  आले होते आणि त्या बंगल्याच्या मोठ्या च्या मोठ्या टेरेस वरती आम्ही बसलो आणि समोरून हिमालय दिसतोय तिकडेच  काळे ढग दिसत होते आणि पाऊस आला इतकं सुंदर वातावरण होतं.  दुसरे दिवशी नगरला जायला  एक मिळाली बसमध्ये  गर्दी नसायची.  लोकल बस मधून फिरायला आवडते, कारण लोकल  लोकं , त्यांची भाषा ऐकायला मजा येते.  आम्ही नगरला उतरलो.  तिथे लोकांनी  सांगितलं की तो जो बंगला आहे  तो गावापासून दोन-तीन किलोमीटर दूर आहे मग काय आम्ही चालत गेलो. पी डब्लू डी  ऑफिस मधून  आधीच सांगितलं होतं जाताना तुम्ही शिधा घेऊन जा ,तांदूळ, डाळ बटाटे कांदे काय असं सगळं घेऊन जा तिथे खानसामा  आहे पण तो जेवायचे शिधा घेऊन  बनवतो. तिथे लाईट नाहीये .

एवढे बुकिंग केले तिकडे जायलाच लागेल  कारण ते गाव इतका छोटे  होते   की तिथं राहायची दुसरी  सोय नव्हती शेवटी आम्ही त्या बंगल्यात पोहोचलो.  त्या दिवशी आम्ही तिथे राहिलो जेवणाचे काही तरी ऍडजेस्ट केले , दोन रात्री राहायचे बुकिंग होतं. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळले  की इथून जवळ अनुसुया मंदिर आहे एका पहाडावरती तुम्ही जाऊ शकता.

आम्ही सकाळी ते मंदिर बघायला जायचं ठरवलं मग आम्ही सकाळी लवकर उठून त्या मंदिराकडे गेलो आम्हाला चढण  चढायला  जवळ एक तास दीड तास लागला आणि खूपच सुंदर मंदिर होतं.  दत्तात्रयांची आई अनुसूया तिचं मंदिर आहे.  मला वाटते भारतामध्ये हे  एकच मंदिर असेल . वरती मोठं  पठार होतं .  लसणाची शेती भरपूर होती, लसुण काढलेला होता तर आम्ही थोडासा तिथला लसूण  घेतला  पैसे घेतलेच नाहीत पण थोडे पैसे दिले. दुपारी  नगर गावात आलो.   रात्री आता काय जेवायला काहीतरी करायला लागेल तिथला जो खान सामा होता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हा एक स्टो घ्या आणि कुकर दिला आणि तुम्ही याच्यामध्येच काहीतरी  खिचडी वगैरे करून खाऊ शकता, आमच्याकडे तेव्हा ब्रेड होता अमुल बटर होतं मध घेतलेला होता लसूण होता डाळ तांदूळ होता बटाटे होते कांदे होते असं सगळं होतं मग मी काय केलं त्या बटरमध्येच लसूण नंतर कांदे बटाटे सगळं घातलं आणि कुकरमध्ये खिचडी केली.

रात्री ती खिचडी खाल्ली आणि सकाळी लवकर उठून आता निघायचं होतं कारण आमचे दोन दिवसाचे बुकिंग होते.   तिथून पुढे जायचं होतं दुगल बिट्टा इथे, असा कळलं की”सुबह एक बस आती है भूख हडताल वाली” तुम्हाला मिळेल मी म्हणलं पुढे काय या नावाचं गाव आहे का तर तो म्हणाला की ही बस भूख हडताल करून चालू झालेली आहे, ही जवळजवळ तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे 1992 मधली, त्या बस मध्ये खूप गर्दी असते मग तुम्हाला जागा मिळेल की नाही वगैरे अशा गप्पा . गावांमध्ये झाल्याचं होत्या.  सकाळी गेलो बस स्टॉप वरती आणि बस आली अकरा वाजता बरोबर आणि मी आत मध्ये चढले, छोटी बस होती तर आत मध्ये सगळ्या सीट्स  भरलेल्या ,बरं हिमालयातल्या त्या रस्त्यावरून बस मध्ये  उभा राहून प्रवास  शक्य नव्हता ,  मी खाली उतरले.  ..  तर तेवढ्यात दोन माणसे उठली बस मधली “आपके लिए हमलोग उधर से बैठके आये है .  आपके लिए दो सीट  है “.   आम्हाला दोन सीट दिल्या बसायला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.  आमचं राहायचा जो  बंगला होता तिथे फक्त तो एक बंगला आहे.  जवळपास १५ किलोमीटर दोन्हीकडे  गाव नाही.  त्या बंगल्यामध्ये गेलो आणि त्याला आमचं बुकिंग दाखवलं  , तो म्हटला की अरेच्चा तुमची रूम मी दुसऱ्या कोणाला दिलीआहे.  ट्रेकिंग करून दमून आलेली लोक आहेत म्हणून  मी त्यांना रूम दिली मग तुम्हाला मी दुसरी रूम देतो व्हीआयपी रूम देतो . आम्हाला काही  प्रॉब्लेम नव्हता.   या व्ही आय पी रूम  मध्ये इंदिरा गांधींना हाऊसअरेस्ट  केलेलं होतं आणि प्रकाश सिंग बादल यांना पण हाऊस अरेस्ट केलेलं होतं.   ती रूम छान होती ती जागा पण खूपच सुंदर होती आजूबाजूला काही नव्हतं दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर कुठलेही गाव नव्हतं त्यामुळे पोल्युशन फ्री सुंदर बंगला . बाहेर खूप छान लॉन  होतं आणि आम्ही तिथे दोन दिवस राहिलो तिथे पण स्वयंपाक केला अजून एक दिल्लीचे दोन फॅमिली राहिलेल्या होत्या दुसऱ्या रूममध्ये तर त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या त्यांच्याबरोबर आम्ही चुलीवर स्वयंपाक केला कुकरमध्ये खिचडी आणि  राजस्थानी भाजी केली . दोन दिवस खूपच मजा आली तिथे एकदम असं धुकं  यायचं दुपारी असं आपण बसलेला असताना आणि एकदम ऊन पडायचं आणि समोरून धुकं  हळूहळू पुढे यायचं फार सुंदर जागा होती . पुढे  आम्हाला जायचं होतं गुप्त काशीला. तो होता पुढच्या बंगला . आमच्या  मॅनेजर ला   लवकर आम्ही रूम सोडायला पाहिजे होती. बस ला वेळ होता . आम्ही बसनेच  जाणार . तेवढ्यात एक इंजिनियर आले तिथे ते  गुप्त काशीला चालले होते जीपने तर ते तुम्हाला उखीमठ ला सोडतील .  नदीच्या पलीकडे गुप्तकाशी आहे आणि तो  तो बंगला होता आणि नदीच्या अलीकडे उखीमठ हे गाव होते. तिथे अनिरुद्ध उषाचा लग्न झालेलं ते देऊळ होतं आणि ते तुम्ही बघा देऊळ आणि मग तिथून तुम्ही त्या गुप्त काशीला जावा खाली उतरायचं थोडसं आणि मग परत वर चढून जायचं आणि तिथून आम्ही चालत चालत गुप्त काशीला जायला निघालो आणि तेवढ्यात आम्हाला एक जण भेटला आणि तर त्यांनी आमच्या बॅगा वगैरे घेतल्या आमचं नाव विचारलं म्हणल्यावर वांजपे त्याला वाजपेयी वाटलं त्या वेळेला वाजपेयी पंतप्रधान होते आणि वाजपेयींना खूप मान होता तिकडे . पुन्हा चालत चालत गुप्तकाशीला पोचलो.

गुप्त काशीचा तो बंगला पण खूपच छान होता .  त्याच्या समोरचा जो एक मोठा हिमालयाचा पहाड दिसत होता तो मान वर करून सुद्धा नजरेच्या टप्प्यात येत नव्हता आणि आम्ही असं बाहेर लॉन वर खुर्च्या टाकून बसलो होतो , समोर दोन  हिमालयाचे उत्तुंग पहाडांचे  दर्शन झाल्या वरती असं वाटलं आपण किती छोटे बिंदू  पेक्षा सुद्धा लहान  आहोत. तिथले  एक्झिक्युटीव्ह इंजिनियर बंगल्यात उतरले होते आमची ओळख झाल्यावर त्यांनी आमच्यासाठी  गौरीकुंडचे बंगल्याचे बुकिंग दिले.  तुम्ही तिथे राहा आणि सकाळी लवकर निघा, दुसरे दिवशी तिथून जवळच असलेल्या गौरीकुंडला आम्ही जाऊन राहिलो .  पीडब्ल्यूडी हाऊस मध्ये एक रूम होती ती मिळाली. सकाळी लवकर उठून  केदारनाथ चे चढण चढायसाठी निघालो पण बऱ्याच जणांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही जाताना घोड्यावरून जावा आणि येताना चालत उतरा . तेव्हा हेलिकॉप्टर वगैरेची  सोय नव्हती, त्यामुळे आम्ही घोड्यावरून निघालो घोड्यावरून निघालो तर जाताना हॉटेल उघडलीच  नव्हती.  थोडसं काही घेतलं होतं तिथे आणि लवकर निघालो त्यामुळे काही ब्रेकफास्ट वगैरे नव्हता आम्ही निघालो तीन साडेतीन-चार तास घोड्यावरून गेलो खूप भीती वाटत होती एका साईडला दरी  तरी दुसऱ्या बाजूला डोंगर गर्दी पण आत्ताच्या मानाने गर्दी खूपच कमी होती  , आम्ही केदारनाथला पोहोचलो प्रचंड थंडी होती.  तिथेही राहायची व्यवस्था होती पण आम्ही काही तिथे राहायचं ठरवलं नव्हतं आणि आम्ही सगळे सामान आमचं खाली होतं गौरीकुंडला होते, म्हणून आम्ही दर्शन घेतलं खूप लाईन नव्हती पण खूप छान दर्शन झालं पण थंडीमुळे काही खूप फिरणं झालं नाही.  आम्ही लगेच चालत उतरायला सुरुवात केली वाटेत  थोडा पाऊस लागला .  आम्ही संध्याकाळी सहा साडेसहाला खाली पोहोचलो गौरीकुंडला मग तिथलं एका हॉटेलमध्येच  नूडल्स खाल्ल्या आणि जाऊन झोपलो प्रचंड दमून गेलो होतो कारण दिवसभर घोड्यावरून जायचं आणि परत चालत उतरायचं एका दिवसात केले होते. दुसरे दिवशी बद्रीनाथची बस ७ वाजता होती तीने निघणार होतो.

Share :