Being Woman

‘बद्रीनाथ’

‘बद्रीनाथ’

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बद्रीनाथची बस घेतली डायरेक्ट, बस एकदम साधी होती १२ तास लागणार होते. आम्ही जोशी मठ चे फॉरेस्ट गेस्ट हाऊस बुक केले होते . बद्रीनाथ च्या आधी जोशीमठ येते. बस पूर्ण भरलेली होती. सगळे आमच्यासारखेच लोक होते यात्रेकरु होते . सगळ्या भारतातून आलेले लोक होते. कोणी राजस्थान वरून कोणी गुजरात वरून कोणी युपी असे सगळे लोक होते. त्यांची ओळख झाली. गप्पा मारल्या. तर त्या वेळेला जे वयस्कर लोक होते त्यांनी आम्हाला काय सांगितलं असेल त्यांनी सांगितलं तुम्ही आत्ता जो प्रवास करताय तो आम्ही तुमच्या वयात करायला पाहिजे होता. तुमच्या या वयात ते आम्ही करायला पाहिजे होता. आम्ही आमच्या म्हातारपणाची वाट बघत बसलो. यात्रेला जायला खरं म्हणजे म्हातारपणी कधी यात्रेला जाऊ नये जे काय असेल ते सगळं तरुणपणात करावे. आता बघा आम्हाला हे बाहेरचं दृश्य बघायला सुद्धा होत नाही. आम्हाला इतकी थंडी वाजते आहे. बाहेर बघू शकत नाही . तुम्ही हे तरुणपणात करता हे खूपच चांगल आहे आणि सगळ्यांनी हे याच वयात केलं पाहिजे. बस जायला लागली बद्रीनाथला. दोन-तीन तासावर होतं आणि प्रचंड घाट एकाबाजुची दऱी इतकी खोल आणि अरुंद होती की त्याचा शेवट दिसत नव्हता. बस अगदी कडेला गेली कि खालची दरी दिसली कि अंगावर काटा यायचा. म्हणून बस खूप हळू जाते. म्हटलं कधी संध्याकाळी पोहोचू आणि आम्ही बद्रीनाथ ला जाणार नव्हतोच .

आम्ही जोशी मध्ये थांबणार होतो. तिथला आम्ही बंगल्याचे बुकिंग केलं होतं. त्यामुळे जोशी मठ पोहोचायचं मग दुसऱ्या दिवशी जोशी म्हटलं जायचं असा आमचा प्लॅन होता. अलीकडे एक पंचवीस तीस किलोमीटर असेल पन्नास किलोमीटर बस बंद पडली काय करायचं ? आता कारण तिथे काही खूप ट्रॅफिक नव्हतं काही नव्हतं सगळ्या बसेस येतो त्यात भरून येत होत्या आणि बसचा फाटा तुटला असं कळलं. त्यामुळे आता भरपूर वेळ लागेल तिकडून आम्ही दुसरी बस मागवलेली आहे आणि मग तो येऊन दुरुस्त करेल इंजिनियर वगैरे असं चाललंय असतील सगळ्या लोकांनी आपापलं सामान बाहेर काढलं तीन दगडांची चूल केली आणि त्या लोकांनी तिथे भात शिजवायला सुरुवात केली. आम्हाला काही कळेच ना म्हणजे आता इथे काय रात्रभर राहायला लागणारे की काय काहीही कळत नव्हतं. तो सारखा सांगत होता मेसेज दिला आहे. मोबाईल फोन तर नव्हतेचं .जवळपास फोन बिन तर काहीच नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या बस बरोबर निरोप दिला परत जाणाऱ्या की आम्हाला बस पाठवा आणि ही बस बंद पडले. आम्ही आपलं थांबलो तिथे इकडे तिकडे बघितलं मग बराच गप्पा मारल्या तेवढ्यात एक बस आली तिकडून तर थांबवली त्यांनी आमच्यासाठी. बस मध्ये मी चढले बघितलं तर आत मध्ये सगळे मिलिटरी चे माणसं बसलेली होती. 25 ते 30 मिलिटरी चे लोक बसलेले होते. बसायला सीट नव्हतीस पण मग काय करायचं मग मी खाली उतरले मग ते कंडक्टर होते मला वाटते या तुम्ही आत मध्ये आम्ही तुम्हाला दोन सीट जागा देतो. मग मी आत मध्ये गेले तर त्यांनी मला कंडक्टरची जागा असते ती दिली तर स्वतः बॅग वरती बसला आणि अरुणला पण त्याने एक सीट दिली आणि आम्ही शेवटपर्यंत जाणार म्हणून सांगितलं. मग त्यांनी काय थोडं तिकिटाचे पैसे घेतले. असंच गप्पा मारल्या. मग मी जोशी म्हटलं उतरलो उतरल्यानंतर एक तर आम्हीच केदारनाथला जाऊन आल्यावर ती खूप म्हणजे खूपच थकलो होतो. त्यामुळे असं आता कुठे जा असेल बंगला तो आम्ही फॉरेस्ट गेस्ट हाऊस ते कुठे असेल असा मी विचार करत होतो तर एकाच मिल्ट्री चे दोघजण भेटले आम्हाला.

आता त्यांना विचारलं की कुठे आहे वरती जायला लागेल बघतो तसं वर चढून जायचं होतं. आम्ही आता कसं जायचं सामान घ्यायचं आणि चढायचं एवढं शॉर्टकट कुठे दिसत नव्हता. शेवटी आम्हाला तो माणूस ते दोघेजण म्हणायला लागले की आम्ही तुमचं सामान घेतो तुम्ही चला. त्यांनी आमचं सगळं सामान घेतलं तर मी म्हटलं बापरे तुम्ही एवढे सामान घेऊन चढता? तो म्हणाला हा समोरचा पहाडा मी याचा दुप्पट सामान घेऊन चढतो तुमचं सामान हे काहीच नाही असं म्हणल्यावर त्यांनी आम्हाला छान होता एकदम मस्त होता पण तो तिथला माणूस म्हणाला तिथे आम्ही काही जेवायला देत नाही तुम्हाला तुमचं जेवण यायला लागेल .अरे मग कुठे जायचं जेवायला? त्याला विचारलं कुठे गाव तू त्याने खाली असा अंधारात दिवे दिसत होते तिथे जायला लागेल परत तिकडे जायचं जिथे आम्ही आलो तिथपर्यंत परत जायचं, उतरायचं ,चालायचं अजिबात ताकद नव्हती. शेवटी आम्ही जे काय जवळ होतं चिवडा, ब्रेड वगैरे असं खाल्लं आणि झोपलो उपाशीपोटी आणि सकाळी उठल्यावर ती मी बाहेर आले म्हटलं बघूया बाहेर कसं आहे ? इतकं सुंदर वातावरण होतं तिथे पाऊस पडत होता. सगळी फुल अशी भरलेली होती बाहेर आणि सुंदर हवा होती आणि सुंदर वातावरण तुम्ही ताबडतोब बाहेर या बाहेर या किती सुंदर आहे बाहेर असं म्हणून त्याला बाहेर बोलवलं आणि आम्ही बाहेर बसलो. मग आम्हाला सांगितलं त्याने अरे इथून एकदम शॉर्टकट आहे खाली जायला. मग तिथे तुम्हाला नाश्ता मिळेल. मग आम्ही पटकन आवरून खाली जाऊन नाश्ता घेतला. आधीचं भुकेने जीव गेला होता. बोलायला सुद्धा येत नव्हतं. तिथे गेल्यावर भरपूर खाऊन घेतलं. आहे ते बघायला गेलो. इतकं शांत आणि सुंदर वातावरण होता की मी असं ठरवलं आपण वय झालं की इथे येऊन राहायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बद्रीनाथ ला जायचं ठरवलं. बद्रीनाथ तिथून एक पाच दहा पंधरा किलोमीटर असेल पण जायला लागतो.

आम्ही बद्रीनाथ ला गेलो कारण आम्ही बद्रीनाथला पण राहायचं ठरवलं होतं. तिथे रूम असतात म्हणून आता आमचं बंगल्यांचे बुकिंग वगैरे सगळं संपलं होतं त्यामुळे आम्ही बद्रीनाथला राहिलो .बद्रीनाथला एक रूम घेतली छोटी. प्रचंड थंडी होती पण कसतरी मॅनेज केलं आणि बद्रीनाथ चे पोस्ट ऑफिस होतं तिथे जाऊन मी एक पत्र लिहिलं माझ्या आई-वडिलांना साताऱ्याला.इथे छान आहे. तुमच्या वयाची सगळी माणसे इथे आहेत .तुम्ही एकदा तरी या इथे बघा असं म्हणून आणि मग आम्ही ते पोस्टात कार्ड टाकलं .त्यांना मिळालं ते म्हणजे सगळ्यात उंचीवरच्या पोस्ट ऑफिस मधून आम्ही ते कार्ड तयार आहे त्यांना पाठवलेलं होतं आता बाकीचं.

Share :