Being Woman

October 2023

‘हिमालय’

‘हिमालय’

आज हा पोखरामधुन हिमालयाची शिखरे बघितल्यानंतर मला आत्तापर्यंत बघितलेल्या हिमालयाच्या विविध भागांची आठवण झाली. पहिलं हिमालयाचा दर्शन मी श्रीनगरला घेतलं होतं.

‘हिमालय’ Read More »

‘लिंब’

beingwoman October 6, 2023 माझं माहेरचं गाव लिंब. इथे आमचा वाडा होता 47 सालि जळल्यावर तो वाडा आजोबांनी तो पुन्हा बांधला. बरीच पडझड झाली होती. आता माझ्या भावाने नवीन स्वरूपात पुन्हा बांधला आहे. लिंब हे पुणे सातारा हायवे वरती सातारा अलीकडे 15 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आत मध्ये तीन किलोमीटरवर आहे. आम्ही दरवर्षी येथे कृष्णाबाई उत्सव साजरा करतो कृष्णा नदी गावातून वाहते. तिच्या काठावर ते अतिशय सुंदर घाट बांधलेले आहेत ,देवळे आहेत. या घाटावरच कृष्णमाई चा उत्सव साजरा होतो.या उत्सवाला साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे वाईच्या शेंडे शास्त्रींनी कृष्णाबाई ला नवस बोलला होता शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला मारण्यासाठी प्रतापगडावर आले त्यावेळी ‘महाराजांना सुखरूप ठेव. आम्ही तुझा उत्सव साजरा करू.’ कृष्णानदी ही महाबळेश्‍वरला उगम पावते महाबळेश्वरला पहिला उत्सव होतो त्यानंतर वाईमध्ये , वाई नंतर भुईंज ,माहुली, लिंब, उंब्रज , कराड सांगली,कुरुंदवाड,नरसिंहवाडी या ठिकाणी उत्सव साजरा होतो महाराष्ट्रात महाबळेश्वरपासून कृष्णानदी जिथून दुसऱ्या राज्यात कर्नाटकात जाते तिथे तिथे प्रत्येक घाटावरती हा उत्सव साजरा होतो.लिंब मध्ये कृष्णा बाईची सुंदर पंचधातूची मूर्ती आहे तिची स्थापना करतात गुढीपाडव्यापासून दहा दिवसानंतर या उत्सवाची सुरुवात होते. गुढी पाडाव्या ला मंडपाची मुहूर्तमेढ होते सगळे जण तिथे जमतात.लिंब गाव सोडून गेलेले हे सगळेजण वर्षातून एकदा लिंबात येऊन हा उत्सव साजरा करतात.सोडून गेलेले असे मी म्हणाले त्याचा अर्थ १९४८ साली घरे जाळल्यावर स्थलांतरित झालेली अनेक कुटुंबे या उत्सवाशी जोडली आहेत. त्यांच्या ४थी पिढीने आता उत्सवाची धुरा संभाळली आहे. लहान असताना आम्हा सगळ्या मुलांना या उत्सवाचे आकर्षण होते. . तिथे ७ दिवस एकत्र राहायचे .सगळया आजी आजोबांकडून कौतुक करून घ्यायांचे. आणि महत्वाचे म्हणजे रोज नदीवर जाऊन पाण्यात डुंबत बसायचे. गुढीपाडव्यानंतर मांडव घातला जायचा ,आणि द्वादशीला देवीची प्रतिष्ठापना व्हायची .तर या उत्सवात घडलेले बदल सांगायचे आहे १५ वर्षांपूर्वी उत्सवाचा मांडव घाटावर घातला जायचा आरती ,पूजा आणि कीर्तन रोज रात्री घाटावरच असायचे. आफळेबुवांची कीर्तने ७ दिवस असायची.भगिनी मंडळाचे हळदी कुंकू घाटावर असायचे .गावातील सगळ्या बायका कृष्णा बाईच्या दर्शनाला हळदी कुंकवाला यायच्या . उत्सव संपायच्या अडले दिवशी छबिना म्हणजे कृष्णाबाईची पालखीतून मिरवणूक असायची. झगझगाट नाही ,डीजे नाही, बत्तीचा आणि मशाली चा प्रकाश आणि ढोल ताशे पारंपरिक वाद्य असायची रात्री १२ पर्यंत छबिना गावातून फिरत यायचा. प्रत्येक घरासमोर ५/१० मिनिटं पालखी थांबली कि आजूबाजूच्या घरातील बायका ओटी भरायच्या.७ दिवस एक एक जणांनी नैवद्य मागून घेतलेला असतो. , गावातील व्यापारी पण एक दिवस नैवेद्य करायचे ,एकदिवस मुख्य दिवस ,एक दिवस गावकऱ्यांसाठी घाटावर भंडारा असायचा.आता बरेच बदल झाले पण मजा तीच आहे.आता उत्सव घाटावर नाही तर खांडेकर यांनी उत्सवाला दिलेल्या वाड्यातच साजरा होतो.नदी ची डगर उतरणे चढणे वयस्कर लोकांना जमेनासे झाले. वाड्या समोरच मांडव घातला जातो, तसाच रोज स्वैपाक होतो , गावातले शेतकरी रोज सकाळी भाजीच्या टोपल्या आणून देतात त्यामुळे कैरीची चटणी, वांग्याची नाही तर कोबीची भाजी,भात आमटी ,पोळ्या गव्हाची खीर ,शिरा असा बेत असतो . त्याच उत्साहाने आरती,होते,अभिषेक, होतो .कीर्तने होतात, सिनेमा दाखवला जातो .छबिना पण नवीन पिढी तशाच प्रथे प्रमाणे काढते ,छबिना थांबत थांबत पुढे जातो,गुलाल उधळतात. “आई जगदंबे कृष्ण बाई मला ठाव द्यावा पायी ” हे भजन म्हणत १०वाजेपर्यंत छबिना संपतो. .मला या ३५० वर्षाच्या परंपरेच्या उत्सवाची ओढ आहे. त्यामुळे उत्सवाची पत्रिका आली कि जायचे हे ठरलेले असते. आतातर काय तिथला माझ्या आजोबांचा वाडा बांधून तयार आहे ,आता ७ दिवस पण राहू शकतो . आणि उत्सवात त्या घरात जाऊन राहायचे लहानपणी जसे राहायचो तसे या कल्पनेने सगळया आठवणी दाटून आल्या आणि हा लेख लिहिला गेला. यामध्ये खूप गोष्टी राहून गेल्यातत्यासाठी मोठे पुस्तकच होईल. तिथली एक एक व्यक्ती वर एक एक पान होईल.असे म्हणतात कि फक्त १९४८ साली उत्सव झालेलं नाही आणि २ वर्ष कोविड च्या साठी मुळे झाला नाही .या वर्षी पण कमीत कमी लोक बोलावून सर्व नियम पाळून उत्सव  होईल – Rohini Wanjpe Share :

‘लिंब’ Read More »

nepal

‘नेपाळ’

beingwoman October 6, 2023 नेपाळ मधल्या एका खेडेगावातल्या जीवन शैली बद्दल बघितले पण इथे भेटलेली रत्ना तिच्या विषयी काही सांगावेसे वाटते . मी तिला सांगितले तुझी गोष्ट मी लिहू का ? त्यांना सगळ्यांना असे माहिती आहे कि मी एक पेपर काढते म्हणजे त्याला ते पत्रिका म्हणतातरत्ना तिथल्या स्त्रियांची एक प्रतिनिधी म्हणू शकतो. असा नाही कि सगळ्याच स्त्रिया अशा आहेत .डॉक्टर्स आहेत ,मॅनेजर्स आहेत. शहरात सगळे आहे तिथेच माझ्या डोळ्याला झालेली इंज्युरी ला नेपाळगंज हॉस्पिटल मधली लेडी डॉ नंदा गुरांग Eye specialist ने उपचार केलेतिथे गेल्यानंतर आमच्याकडे काम करण्यासाठी बाई आली ती म्हणजे रत्ना. मी विचारलं की तुझ्या घरी कोण कोण असतं तर दोन मुलं आहेत. मोठ्या मुलीचे लग्न होऊन ४ वर्ष झालीत आणि म्हणजे तीन मुलं . मोठ्या मुलीचा नवरा तिला सोडून गेलेला आहे काठमांडू मध्ये ती नोकरी करते .आता करोना मुळे तिचे पण प्रॉब्लेम आहे .तिचे पण शिक्षण नाही . रत्नाचेही शिक्षण नाही.तीन मुले झाल्यावर रत्नाचा नवरा पण तिला सोडून गेलाय.डिवोर्स वगैरे काही नाही. भारतात नोकरी करतो. आणि दुसऱ्या बाई बरोबर राहतो .शिक्षण फक्त ४थी पर्यंत तरी रत्नाने खूप ठिकाणी नोकऱ्या केल्या मुलाना आई वडीलां जवळ ठेवून ,मुंबई,लखनौ ,दोन वर्ष दुबई त्यामुळे घरातील कामाची नीट माहिती आहे .मॅनरस माहिती आहेत, स्वैपाक बनवायचे जसा पाहिजे तसा माहित आहे. पैसे साठवल्यावर शेती घेतली होती पण सासर्यांनी परस्पर विकून टाकली मग ५/६ वर्षां पूर्वी पुन्हा पैसे साठवून घर बांधले.घरी सगळे आहे टी व्ही ,मिक्सर , फ्रीज मुलांनी बिघडवला त्यासाठी नेहमी सांगत असते .हळू हुळू ३ महिन्यात गप्पा मारता मारता सगळे तिने सांगितलेमाझ्या कडे नोकरी आहे आणि बाकी शेळ्या बकरी पाळून काही पैसे मिळतात पण मुलांच्या डिमांड जास्त असतात . चांगलया मोबाईल पाहिजे ,टी व्ही केबल , पाहिजे .लाईट बिल खूप येते ,दिवसभर कष्ट करत असते ,तिच्या मोबाईलची पूर्ण वाट लावली आहे मुलांनी गेम खेळून ,त्यांच्या मागण्या संपातच नाहीत. लॉक डाउन मध्ये तिथे खूप उन्हाळा होता. मुलांनी उन्हात जाऊन काही उपद्याप करू नायरत म्हणून कॅरम आणला भारीतला. सतत मुलाचा विचार चालू असतो तिचा .नेपाळ मध्ये व्दिभार्या प्रतिबंधक कायदा दोन वर्ष पूर्वी आला तो पर्यंत एक बायको असताना दुसरे लग्न करून राहायचे जर घटस्फोट हवा असेल तर बरेच कंलिकेशन्स होते . मी तिला नेहमी विचारायची कि तू मुलांच्या खर्च साठी नवऱ्या कडून पैसे का नाही घेत ? शाळेची फी भरली नाही म्हूणन शाळेत जात येत नाही. त्यात लोक डाऊन मुळे अजूनच. नेमके डिसेंबर २०२० मध्ये आम्ही तिथे गेलो आणि रत्ना ला आमच्या कडे नोकरी मिळाली रोज सकाळी जेव्हा सांगेन तेव्हा यायचे .सकाळच्या चहा पासून रात्री स्वैपाक करायचा. घरी ४ वाजताच उठून बकऱ्याचे खाणे बनवणे ,गवत आणणे, घरासमोर शेती आहे तिचे काम करणे , मग ७ वाजता आमच्या घरी. .पुन्हा ९.३० पासून गवत काढणे.,परत १२.३० ला ते २ आमच्या घरी दुपारचा स्वैपाक . तरी तिची मुलगी घरी स्वैपाक कराते , घर साफसफाई करते. एकही दिवस सुट्टी नाही. एखादे दिवशी स्वैपाकात गडबड झाली कि मी विचारते ” आज काय टेंशन ? मग तिचे उत्तर असायचे “आज नवऱ्याने फोन केला .मी नेपाळ ला येतो ” मग ती म्हणायची याला खायला कुठून घालू ? ” किंवा लाईट बील आले भरले नाही .लाईट कट झाली.आई वडिलांचा, बहिणीचा थोडा आधार आहे . पण एकंदरीत मला सगळे वागणे पटायचे नाही. मुलगी १६ वर्षाची आणि मुलगा १२ वर्षांचा . तिच्या मुलीचे म्हणणे आहे कि ती मोठ्या बहिणी सारखी आणि आई सारखी जाड नाही होणार . केटरिंग शिकणार. लवकर लग्न करणार नाही.वरील सगळे वाचून असे लक्षात येते कि तिथे लग्न खूप लवकर होतात, अगदी १४/१५ वर्ष मुलींची आणि १८/१९ ला मुलांची , मुले लवकर होतात ,नंतर पुरुष बायकोला सोडून जातात ,दुसऱ्या बाई बरोबर लग्न हि करतात .पण मुलांची जबाबदारी बाईचीच. अशा खूप लहान मुली पहिल्या . मी म्हणायची वो छोटी बच्ची आयी थी . मग रत्ना मला माहिती पुरवायची ” बच्ची कहा मॅडम उसके तो २ बच्चे है.७ और ८ सालके . उसके आदमी ने छोड दिया उसको , अब कॅन्टीन मे काम करती है “. असे तिने ४/५ मुलींच्या बद्दल सांगितले.त्या छोटया खेडेगावातल्या मुली पार्लर चालवतात .शेतीची कामे करतात ,भाज्यांचे दुकाने चालवतात ,दुकानात सगळेजण काम करतात.काही प्रमाणात आपल्याकडे पण हि परिस्थिती आहे पण त्यांना कायद्याचा आधार आहे .रत्नाला पण हा आधार मिळू शकतो त्यांच्या देशात आता कायद्याचे पाठबळ आहे .नवीन मुलींना हे मिळते. बदल घडतो आहे तरीही एक एकटी बाई मुलांना कष्ट करून वाढवते. नवऱ्याने सोडले तरी कुठेच तक्रार करत नाही. रोज भांगात सिंदूर भरते ,घामाने तो सिंदुर र कपाळ भर पसरतो तेव्हा मीच तिला सांगते अग आरशात बघ जो तुला सोडून गेलाय तयाच्या नावाचा सिंदूर कपाळ भर झालाय. मंगळसूत्र घालते . सुंदर दिसण्यासाठी जे काही आहे ते करतेच . तर एका स्त्री ची गोष्ट मला नेपाळच्या स्त्रियांच्या बाबतीतच नाही सर्व स्त्रियांची प्रतिनिधिक वाटते.  – Rohini Wanjpe Share :

‘नेपाळ’ Read More »

‘तिसरी नोकरी’

beingwoman October 6, 2023 मराठेज मध्ये प्लेसमेंट बघता बघता एक दिवस मी बघितलं तर आम्ही चार पाच मुलांना मी आशिया टेलिव्हिजन नेटवर्क नावाची एक कंपनी होती आणि तिथे मी मुलांना पाठवलं होतं आणि तिथे जनरल मॅनेजर होते प्रदीप दीक्षित ते आमच्या ओळखीचे होते ते जे जे मध्येच राहायचे आमच्या एका कलीगचे मिस्टर होते. आमच्याकडे आले होते आणि मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे आमच्या इन्स्टिटयूट ची मुले नोकरीला जातात तर ते म्हणाले तुम्हाला हवी एका नोकरी तिथे? मी म्हटलं हो चालेल ना कारण असा होता तेव्हा मास मीडिया कम्युनिकेशन किंवा हे कुठलीच कोर्सेस नव्हते डायरेक्टली तिथे जॉब मिळायचा तर मी त्यांना म्हटलं की मला चालेल मला आवडेल मग त्यांनी मला सांगितलं तुम्हाला एवढा पगार मिळेल तर मी खूपच आनंदून गेले कारण हा जो पगार होता पहिल्याच्या तिप्पट होता. दुसरे दिवशी मी आणि अरुण पार्ल्याच्या ऑफिस ला गेलो सकाळी १० वाजता ऑफिस सुरु होण्याच्या वेळेला तर ऑफिस मध्ये कोणीच नव्हते एक ऑफिस बॉय ला विचारले बाबला बॅनरजी म्हणून एवढ्या लवकर येत नाहीत मी म्हटलं आता काय कधी येतात ते त्यामुळे एक-दीडच्या पुढे येतात ते तिथे मी बसले मग अरुण ला म्हणलं तू जा घरी मी थांबले मग जरा पुढे गेल्यावर ती एक मुलगी आणि एक जण होते नंतर कळले ती एस्टर माझी मैत्रीण झाली , आणि सलीम भाई कॉम्प्युटरवर काम करत बसलेले. त्या ऑफिस मध्ये कॉम्प्युटर ठेवलेले, खुर्च्या, प्रत्येकाला खूप छान होतं नंतर मी थांबले तिथे मग बाबला आले ओळख करून दिली मग मला टी सिरीज च्या ऑफिस शी कॉ ऑर्डीनेट करायचा आहे असे सांगितले मग मी आणि बाबला त्या ऑफिस गेलो .ते भव्य ऑफिस,रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रथमच पहिले ,मी एकदम भारावून गेले तिथे खूप जणांची ओळख झाली आता माझ्यशी कॉओर्डीनेट करायचे. ही तू मला आता बाकीचे काम समजावून सांगेन त्यामुळे माझा पहिला दिवस खूप भारी होता . पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ती सुद्धा खूपच भारी होतं. दुसऱ्या दिवशी मी बरोबर दहा वाजता ऑफिसला पोहोचले कारण टाइमिंग मला माहिती नव्हतं मी गेल्यानंतर मग ऑफिसला मला कळलं की टाइमिंग अकरा वाजता आहे सगळेजण अकराच्या पुढे येतात मी म्हटलं ठीक आहे मला तर खूप लांब यायचं होतं जे जे हॉस्पिटल वरून येण म्हणजे मला दोन वेळा ट्रेन बदलायाला लागायची, भायखळा दादर ,दादर ते पार्ला . तेव्हा मला हा जॉब आवडलेला होता. मग हळूहळू आमच्या इथे बरीच लोक जॉईन झाली . कॉम्प्युटर मध्ये कॅसेट्स प्रोग्रॅम होता,तो कसा वापरायचा , काय काय करायचं अर्थ स्टेशनला जी मुलं असायची त्यांना काय काय इंफॉर्मेशन पाठवायची, आधी यु-मॅटिक कॅसट्स होत्या ,त्या गेल्या आव ऍडव्हान्स बीटा कॅसेट्स आल्या. एडिटिंग स्टुडिओ मध्ये दोन नवीन बीटा मशीन आली , मशीन वापरायला एडिटर होते आमच्याकडे त्या मशीन मध्ये गाणी तयार करायची कुठली गाणी घ्यायची त्यांचे पॅकेजेस तयार करायचे भक्ती गीत, रक्षाबंधनची गाणी, लोकगीत असं त्यानुसार आम्हाला आम्ही पॅकेजेस बनवायची आणि ती ब्रॉडकास्ट स्टेशनला पाठवायचं तर आमच्याकडे सिनेमा लिस्ट बनवायला लागायची . ते काम माझ्याकडे होते. आमच्याकडे फक्त दीडशे सिनेमे कॉन्ट्रॅक्ट केलेले होते त्याप्रमाणे ते सिनेमे लावायचे म्हणजे आज रात्री चा सिनेमा दुसऱ्या दिवशी दुपारी असायचा.शनिवार रविवार चांगले सिनेमे लावायचे , मग एक दिवस काय झालं 14 फेब्रुवारी ला मी असाच कुठलातरी सिनेमा लावलेला दो गज जमीन के नीचे नावाचा . सगळे आल्यावर विचारले कि हे काय उद्या काय माहित आहे का ? वॅलेंटाईन डे आहे रोमँटिक सिनेमा पाहिजे. खरंच तेव्हा या दिवसाचे फॅड नव्हते मग लगेच सिनेमा बदलायला सांगितला .आणि मटा मध्ये मी त्याच दिवशी वाचला होते असे खूप प्रसंग आलेत्यातून निभावून गेले .खरं तर कॉमन सेन्स मुळे . (क्रमश:)  – Rohini Wanjpe Share :

‘तिसरी नोकरी’ Read More »

‘नोकरीच्या कथा’

माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफिस मध्ये केलेल्या नोकऱ्या आणि तिथले अनुभव.
माझ्या सगळ्या नोकर्‍या एंटरटेनमेंट क्षेत्रातल्या होत्या . माझी पहिली नोकरी मुंबई रेस कोर्स ला होती

‘नोकरीच्या कथा’ Read More »