Being Woman

‘हिमालय’

‘हिमालय’

आज हा पोखरामधुन हिमालयाची शिखरे बघितल्यानंतर मला आत्तापर्यंत बघितलेल्या हिमालयाच्या विविध भागांची आठवण झाली. पहिलं हिमालयाचा दर्शन मी श्रीनगरला घेतलं होतं. आयुष्यात प्रथमच बघितलेले बर्फाची शिखरं. हिंदी सिनेमात खूपच पाहिली होती .दाल लेक च्या शिकारयात बसून पाहिली. हिमालयाची उंच शिखर किशतवार च्या डकसुम या उत्तरेला असलेल्या एका टुरिस्ट गेस्ट हाउस मध्ये राहून तिथे बघितलेला अत्युच्च हिमालय. त्या सर्वांची आठवण झाली ज्या वेळी आम्ही काश्मीर बघितले त्यावेळी काश्मीर मधली सुंदर घरं ,सुंदर मुली ,नितळ असा दाल लेक,शंकराचार्य मंदिर ,भवानी मातेचे मंदिर या सर्व गोष्टी आठवल्या . जम्मू ते श्रीनगर केलेला जवळजवळ बारा तासांचा प्रवास आणि आनंतर सकाळी झालेले हिमालयाचे दर्शन आणि त्या क्षणापासून माझे हिमालयाचे नातेअधिक घट्ट झाले
आणि त्यानंतर का कोणास ठाऊक हिमालयाचे पसरलेले पूर्व-पश्चिम प्रत्येक भाग कसा असेल असं वाटत होतं .
दुसर्‍याच वर्षी आम्ही हिमाचल प्रदेश मध्ये ट्रेकिंग ला जायचं ठरवले हा ट्रेक युथ हॉस्टेल स ऑफ इंडिया यांनी अरेंज केलेले होते माझा आते भाऊ विनय राजोपाध्ये यांनी लिहिलेला ट्रेकिंगबददलचा लेख आणि मनोहर या मासिकात वाचला आणि त्याच वेळेला मी ठरवले की आपण हा ट्रेक करायचाच आपण येथे जायचेच .नंतर मुंबईत गिरगावात युथ हॉस्टेलचा ऑफिस शोधून काढलं तिथे जाऊन सगळी चौकशी केली आणि आम्ही दोघे जण पैसे भरून आमच्या ट्रेक च्या तारखा नक्की केल्या रेल्वेची बुकिंग केली.पठाणकोट पर्यंत रेल्वे नी गेलो नंतर मनाली पर्यंतचा बसचा प्रवास साध्या बसने केला रात्री आठ वाजता आम्ही रायसन या बेसकॅम्पला उतरलो .काहीही माहिती नव्हते कॅम्प मध्ये गेल्यानंतर पुरुषांचे टेंट वेगळे आणि बायकांसाठी रुम होत्या आम्ही आपापले सामान वेगळे करून अलॅाट झालेल्या टेंट आणि हटस मध्ये गेलो.रात्री जेवणे झाली जेवायला पुरी छोले बटाट्याची भाजी भात खीर असं जेवण होतं रात्री कॅम्पफायर होतं गरम गरम बोरनवहीटा मिळाला. सकाळी ५ वाजता बेड टी आला. उठून तयार होऊन व्यायामाला जायचे.
आम्हाला नंतर अशी माहिती सांगण्यात आली की आम्ही आता याच्या पुढे तीन दिवस या बेस कॅंपला राहणार .तीन दिवस आम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल नंतर चौथ्या दिवशी आम्ही हायर कॅम्प ला निघणार .
आमच्याबरोबर बँक ऑफ इंडिया चा मुलांचा बारा जणांचा एक ग्रुप होता आणि एक पारशी जोडपं आणि काही मुंबईचे लोकं होते एकूण 60 जणांचा ग्रुप एका दिवशी निघायचा .ग्रुपमधले 30 जण खौली पास आणि चंद्रखणी पास अशा दोन ट्रेकला जायचे .बेस कॅंप वर तीन दिवसात आमचे आमच्या ग्रुप शी खूपच छान ओळख झाली .खूप गप्पा मारल्या खूप गाणी म्हणालो आणि सर्व ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केले रिव्हर क्रॉसिंग,रॅपलिंग ,सकाळी पळणे सगळ्या गोष्टी आम्ही खूप एकदम यशस्वीपणे केल्या .
हायर कॅम्पला जायच्या आदल्या दिवशी सगळ्यांनी आपण कॅम्प ला काय काय बरोबर नेणार आहे आहे ते सांगावे लागे . पावसासाठी प्लास्टिक, जेवणासाठी प्लेट ,मग ,गरम कपडे हे सगळं हे सगळं आम्हाला दाखवायला लागलं हेतू हाच की खूप जास्त सामान पण घेऊन जाऊ नये आणि खूप कमी पण घेऊन जाऊ नये .आवश्यक तेवढेच सामान घेऊन जावा .आम्ही सगळे या प्रकारात खूपच मजा करायचो .दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही हायर कॅंपला जायला निघालो आणि कॅम्प वरचे सगळेजण आम्हाला निरोप द्यायला दोन्ही साईडला उभे होते आमच्या आमच्या ग्रुपला चियर करत होते.खूप उत्साहात आनंदात आम्ही पहिला कॅंप साठी निघालो .पहिला कॅंप जाना होता
बरया पैकी चढण होती छोटी पायवाट पायरया पायरयंची शेती लाकडी घरं लागत होती. आम्हाला काहीच कल्पना नव्हती सगळीकडे नुसते खडूने बाण काढलेले होते आणि त्या रस्त्याने आम्ही जायचो बरोबर पॅकलंच होतं आम्ही ते लंच घेतलं बरोबर दिलेले बिस्किटांचे पुडे गोळ्या होत्या .एकदम एक जण आम्हाला भेटला आणि वेलकम टु जाना असं म्हणाला आम्ही सगळे जण चकित झालो आणि हा कोण माणूस आहे मग आम्हाला कळलं की हा पुढच्या कॅम्पचा कॅम्प लीडर आहे आणि तो आम्हाला घ्यायला आलेला आहे .
याचा अर्थ असा होता की कॅम्प जवळ आला होता आणि आम्ही सगळे खुश होऊन तिथे पोचलो. मुलींचे टेंट वेगळे होते मुलांचे टेंट वेगळे होते आम्ही सगळे जण आपापल्या टेन्टमध्ये गेलो हात पाय तोंड धुऊन कपडे बदलून टेन्टमध्ये परत येईपर्यंत गरम गरम चहा तिखट मीठ लावलेले शेंगदाणे आणि गरम-गरम कांद्याची भजी आमची वाट बघत होते . गप्पा मारून झाल्या सगळं खाऊन झाल्यावर कॅंप लिडर ने शिटटी मारली आणि सांगितलं चला उठा आता आपल्याला कॅम्प फायर साठी लाकडे गोळा करायची आहेत. सगळ्यांनी जाऊन लाकडे गोळा करून आणली . संध्याकाळी साडेसात वाजता जेवण झाली सात ते आठ साडे आठ कॅंप फायर झाला.गाणी झाली. गरम बोरनवहिटा पिऊन रात्री सगळे जण झोपले.सकाळी साडेपाच वाजता बेड टी मिळायचा त्यानंतर सगळे तयार होऊन आठ वाजता ब्रेकफास्टसाठी जमायचं आणि नऊ वाजता पुढच्या कॅम्पला निघायचं कारण आमच्या नंतर येणाऱ्या ग्रुप साठी त्यांना कॅम्प तयार करून ठेवावा लागे असं पंधरा दिवसांच्या ट्रेकिंग आम्ही केलं. हिमालयात खौलीपास दोन वेळा १२००० फुट चढून तिथून दिसणारे हनुमान तिबबा शिखर आणि दुसरी शिखरे सुर्योदयाचया वेळी पहिली.
चंद्रखणी पास चा ट्रेक एकदा केला. १२५०० फुट उंच या ट्रेक मधे देव तिबबा
पीर पांजाल रेंजेस आणि हिमालयातील उंच शिखरे आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य या ट्रेक मधे पाहिले.या ट्रेक मधे देवदार वृक्ष ज्याची साल म्हणजे भुर्रज पत्र या वर आपले वेद आणि ग्रंथ लिहीले गेले.याल कधी वाळवी लागत नाही. आम्ही आणलेली भुरज पत्र अजुनही आहेत
मणीकरण गरम पाण्याचे झरे असलेलया
या ठिकाणी आम्हाला एक दिवसांची रेस्ट असे इथून जर कोणाला ट्रेक सोडायचा असेल तर या इथून तो बस ने परत जाऊ शकायचा आणि मनिकरण नंतर जे कॅम्प होते ते रिमोट एरिया मध्ये होते .
मनिकरण नंतर ३० लोकांचे ग्रुप वेगळे व्हायचे एक ग्रुप खौलीला एक ग्रुप चंद्रखणी ला जायचा.या पंधरा दिवसाच्या ट्रॅकिंग मध्ये सगळा अनुभव घेतला. हिमाचल प्रदेश मधला हिमालय हा श्रीनगरच्या हिमालया पेक्षा अतिशय राकट असा जाणवला होता .श्रीनगर चा हिमालय एकदम लडीवाळ, रोमॅंटीक ,प्रेमळ ,सुंदर असा होता ट्रेक मधे हायर कॅंपला पाहिलेला हिमालय हा कणखर ,अतिशय उंच ,तुमच्यात कणखरपणा जागवणारा ,समोर येईल त्या अडचणीवर मात करायला शिकवणारा असा होता.
आम्ही ओळीने ३ वर्ष हे ट्रेकिंग केले. वेगवेगळ्या ग्रुप बरोबर.
एकदा सगळे डॅाकटर होते .
एकदा फॅमिली आणि मित्र.
हिमालयाचे हे दोन भाग अशा प्रकारे अनुभवले
पुढचा भाग उत्तराखंड पुढच्या भागांत

Share :