मराठीतील पहिली स्त्री गझलकार संगीता जोशी
सर्व प्रथम महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!! खरे तर रोजचा दिवसच व्हावा महिला दिन!!!
स्त्रीने पादाक्रांत केले नाही असे एकही शिखर नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक टप्प्यावर बदल करून घेत स्त्री आज आघाडीवर आहे. पूर्वीच्या स्त्रियांनी केलेला संघर्ष, त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा, त्यांचे कष्ट यामुळे आजची आपली वाट प्रशस्त केली आहे. त्यांच्या खांद्यावर पायठेवूनच आपल्यावाटा अधिक उन्नत झाल्या आहेत. त्या सर्व भगिंनीना प्रणाम!
तर गझलियत या सदरात आपण आज ओळख करून घेऊया पहिल्या मराठी गझलकार संगीता जोशीयांची.
गझल हा स्त्री विषयक काव्यप्रकारच असल्याने या मध्ये नेहमीच स्त्री बद्दल लिहिलं जायचं पण ते पुरुषांकडून!पुरुषांनी स्त्री बद्दल लिहिलेलं असल्यामुळे त्यात प्रामुख्याने पुरुषांच्याच भावना व्यक्त होत असत.
संगीता जोशीयांनी गझलहा काव्यप्रकार प्रथम हाताळला आणि स्त्रियांना गझलेची वाट प्रशस्त करून दिली यामुळे स्त्रि यांच्या मनातील खदखदत्यांची दुःखं, त्यांच्या व्यथा वेदना या गजलेत मांडता येऊ लागल्या आणि स्त्री सुलभ असे अनेक विषय गझलेमध्ये नव्याने समाविष्ट झाले आणि गझल अधिक समृद्ध झाली.
अगदी आजही स्त्रियांचं गझल लिहिण्याचं प्रमाण पुरुष गझल कारांच्या तुलनेत कमीच आहे पण तरीही आज प्रचंड संख्येने स्त्रिया लिहीत आहेत व्यक्त होत आहेत याचं श्रेय संगीताताईंनाच जातं.
आदर्श शिक्षिका म्हणून गौरवल्या गेलेल्या संगीताताई लेखनात रमतात. त्यांचे पाच काव्य संग्रह प्रसिद्ध असून गझल लेखनाच्या अनेक कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत.
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एक चाकोरी एक तेचतेचपण आलेले असते. हीच मोठी अडचण असते. आपल्याला जे हवे ते मिळत नाही. जे मिळते त्यालाच आनंद मानून घ्यावा लागतो. अनेकदा खूप वाटचाल करूनही आपण आहेत तिथेच आहोत असे जाणवते. याच भावना नेमकेपणाने यापुढील शेरात संगीताताई मांडतात.
आयुष्य तेच आहे
अन्हाच पेच आहे
समजायचे उन्हाला
हे चांदणेच आहे
मी चालते तरी ही
आहे तिथेच आहे!
एक स्त्री जेव्हा सगळ्या संघर्षाला पुरून उरते आणि आपली वेगळी वाट चोखाळते. आपल्या स्त्रीसुलभ गोष्टी मग तिला विसराव्या लागतात.
एकटीस्त्रीआजलारस्त्यातआली
काकणे केलीत काळाच्या हवाली
स्त्रीला नेहमीच आपले आयुष्य पणाला लावावे लागते. स्वत:चा विचार न करता सर्वांसाठी झिजावे लागते. इतके करूनही तिला श्रेय कधीच मिळत नाही. त्यामुळे
राहिलेआता रिकामे हात माझे
सांडले आयुष्य मी रस्त्यात माझे
हा शेर अगदी प्रत्येक स्त्रीला आपलासा वाटतो.
जगाने सोलले काळीज माझे
पुन्हा या आसवांना ही मनाई
हिऱ्यांची अक्षरे माझी तरीही
जमेला कोळशाची हीकमाई!….
कुठे स्वप्ना, तुझी शोधू सुखेमी
तुझी केली किती मी सरबराई….
स्त्रीला नेहमीच सगळे सहन करत आयुष्यभर झिजावे लागते आणि पुन्हा हसत राहावे लागते. आपली स्वप्ने सुखे विसरावी लागतात.
आयुष्याच्या वाटचालीत कोणालाही सुख उसने मागता येत नाही. मग वास्तव स्वीकारून मनाची समजूत घालावी लागते..
मागणे बरे नव्हे कुणास चांदणे
या पुढे म्हणायचे उन्हास चांदणे
संगीताताई, तुमचे उदंड लेखन होत राहो हीच शुभेच्छा!
स्वाती यादव
9673998600

























