Being Woman

blog img

‘मेधा कुलकर्णी कॅलिडिओस्कोप’

     ज्या समाजात आपण राहतो, वाढतो, रुजतो त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो ही सामाजिक बांधिलकीची भावना मनामध्ये जपत सामाजिक काम करणारी काही मोजकीच व्यक्तिमत्त्व असतात. असंच समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या ‘मेधा कुलकर्णी’. 

    राजकारणातील एक आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या, लोकांच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य ती अंमलबजावणी करणाऱ्या आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या मेधा कुलकर्णी. 

     मुळात पेशाने प्रोफेसर असणाऱ्या मेधाताई यांना आपण राजकारणात जाऊ अस कधी वाटलं नव्हतं. सन 2002 मध्ये काम करत असताना अचानक त्यांना ही संधी लाभली. त्यावेळी भारतीय जनता पक्षातर्फे कोथरूड विभागातून महिला उमेदवार (शकतो शिक्षिका असलेली) अशी हवी होती आणि त्या वेळी त्यांना मेधा कुलकर्णी यांची निवड केली. 

    त्यांच्या घरातील वातावरण हे संघ परिवाराचे असल्यामुळे समाजकार्य यासाठी त्यांना कुठेही अडकाठी आली नाही किंबहूना तिकिटासाठी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यावेळी घरातून भक्कम पाठिंबा लाभला. कोणीतरी येऊन काहीतरी करेल ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण स्वतः पुढे होऊन हे कार्य करावं या दृष्टिकोनातून त्यांनी या उमेदवारीसाठी अर्ज भरला. 

    कोणतीही पार्श्वभूमी नसताना मानत समाजकार्याची भावना ठेवून सुरू केलेल्या या कार्याला जनतेचाही उदंड प्रतिसाद लाभला आणि भरघोस मतांनी मेधा कुलकर्णी या नगरसेविका पदावर निवडून आल्या. इथून त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. नगरसेविका पदावर असताना विविध प्रश्नांवर अगदी नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी त्या सक्रिय राहिल्या. माणसाचं काम बोलत अस म्हंटल जातं हेच मेधाताईंच्या बाबत घडलं. प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर योग्य ती अंमलबजावणी करत त्यांनी विविध कामे पूर्ण केली. प्रेमळ स्वभाव, प्रत्येकाची आपुलकीने चौकशी, प्रसन्न भावमुद्रा आणि हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची महात्त्वकांक्षा या विविध पैलूंमुळे त्या लोकप्रिय नगरसेविका झाल्या. नियोजनपूर्ण काम ही त्यांच्या कामाची खासियत आहे. मेधाताई नेहमी सांगतात की कोणताही काम करताना पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. 

   नगरसेविका ते आमदार असा चढत्या आलेखाचा टप्पा त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने, मेहनतीने, विविध अडचणींवर मात करत यशस्वीपणे पार केला आहे. या कालावधीत त्यांनी विविध पदेही भूषविली आहेत. जीवनातील या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबियांची उत्तम साथ त्यांना वेळोवेळी लाभली आहे किंबहूना लाभत आहे. म्हणूनच आपल्या यशात कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे हे त्या आवर्जून सांगतात. 

     राजकारणा सारख्या व्यापक क्षेत्रात काम करत असताना, अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी कुटूंब, नोकरी आणि राजकिय क्षेत्र याचा योग्य तो समतोल सांभाळला आहे. नानाविध गोष्टी करत असतानाच वाचन, गाणी ऐकणे, चित्र काढणे, फोटोग्राफी असे अनेक छंद त्या सवड काढून जपत असतात.

     स्त्री ही एकाचवेळी विविध भूमिका उत्तमरीत्या पेलवू शकते तिची तेवढी क्षमता असते हे त्या आवर्जून सांगतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आतला आवाज ओळखण अत्यंत महत्वाचे आहे. करिअर आणि घर या दोन्ही गोष्टी सांभाळताना जिथे ज्या गोष्टीला जेव्हा प्राधान्य देणं गरजेचं आहे ते दिलंच गेलं पाहिजे. सगळ्या गोष्टींचा समतोल राखला गेला पाहिजे. कोणतीही गोष्ट शिकताना त्याच्या मुळापर्यंत जा, स्वतःला कमी लेखू नका. उत्तम बुद्धिमत्ता म्हणजे यशस्वीता नाही यशस्वी होण्यासाठी विविध पैलू असण ही गरजेचं असतं. स्वतःला घडवा, सक्षम बना आणि आपल्याबरोबर देशाच्या विकासाचा जरूर विचार करावा असं मत मेधाताई यांनी व्यक्त केलं. मेधाताई यांचे कार्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. 

    बिइंग वुमन हे पाक्षिकही उत्तम सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत कार्य करत आहे याचे त्यांनी विशेष कैतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी टीमला शुभेच्छाही दिल्या.

टायटल ऑप्शन 

अष्टपैलू राजकारणी

Share :