आता आपल्याला आकाशातले दोन ठळक तारका समुह माहिती झाले आहेत सप्तर्षी आणि शर्मिष्ठा. त्यातल्या सप्तर्षींची शेपुट धरून आपल्याला पुढचे बरेच तारका समुह माहितीकरून घेतायेतात. सप्तर्षींची शेपुट तशीच गोलाकारात पुढे वाढवली की एक तेजस्वी तारा लागतो, तो म्हणजे स्वाती. त्याचे पाश्चात्यनाव Arctrus. हा या तारका समूहाचा योग तयार आहे. स्वाती तारा टोकाला समजून त्या गोलाकाराच्या स्पर्षरेषेच्या (टँजटच्या) दिशेने गेल्यास एक लांबट आडवा चौकोनी आकाराचा तारका समुह लागतो. त्याचा आकार खरेतर आडव्या आईस्क्रिमच्या कोन सारखा असतो. त्याचे नाव भूतप, पाश्चात्यनाव Bootes असे आहे.
भूतपाविषयी अनेक आख्यायिका पाश्चात्य पुराणात आहेत. भूतप म्हणजे बुट्सहा एक गुराखी असून त्याचा देह मानवाचा आणि डोके बैलाचे आहे असे ईजिप्शियन पुराणात आहे. ग्रीक आख्यायिकेनुसार सप्तर्षीहीगाडी असून ती चालवणारा हाबुट्स आहे. दुसऱ्या एका कथेत बुट्सहा महान संशोधक शेतकरी असून त्यानेच नांगराचा शोध लावला असे सांगतात. सप्तर्षींना काही लोक नांगर मानतात त्याचे कारण हे असू शकते.
बुट्सहापारधी असून त्याने हातातल्या दोरीने दोन कुत्र्याना बांधून धरले आहे, ती कुत्री म्हणजे श्यामशबल (कॅनेसव्हेनाटीसी ) हा तारका समूह होय. या पारध्याच्या पायाशी स्वाती तारा दाखवतात.
बुट्सच्या निमुळ त्या टोकाला स्वाती तारा आहे. हा खूप तेजस्वी तयार असून त्याची तेजस्वीतेची प्रत 0.2 आहे. हा तारा लाल रंगाचा असून हा आपल्यापासून साधारण 32 प्रकाशवर्षे दूर आहे. हा तारा आकाराने आणि तेजाने इतका प्रचंड आहे की आपला सूर्य जर त्याच्या ठिकाणी ठेवलातर आपल्याला पृथ्वीवरून तो दिसणारच नाही. स्वातीला स्वतःची अशी गती असून तो दर सेकंदाला सुमारे 5 कि. मी. एवढ्या वेगाने आपल्यापासून दूर जातोय. या दूर जाण्याने त्याच्या ठळक पणात फारसा फरक पडणार नाही कारण अंदाजे 800 वर्षात तो चंद्र बिंबाच्या व्यासा इतकाच सरकलेला असेल.
भूतपाच्या खालच्या बाजूला एक खूप सुंदर अतिशय देखणा असा तारका समुह आहे त्याचे नाव Corona Borialis असे आहे. त्याचा आकार एखाद्या मुकुटा सारखा आहे. ऱाणीचा रत्नजडित मुकुट.