Being Woman

blog img

‘कॅलिडिओस्कोप’

माळेतले पदक

कोरोनाच्या काळात भरपूर नैराश्‍याने पछाडलेल्या बायकांमध्ये आत्मविश्वास संपत चालला होता. नवी उमेद संपली होती. पुढचं आयुष्य अंधकारमय दिसत असून सगळ्याच डिसचार्ज  झालेल्या बायकांना रिचार्ज करण्याचे काम केले ते म्हणजे वैशाली पाटील यांनी. रिचार्ज सुद्धा फार भन्नाट होते. महाराष्ट्राची सौभाग्यवती ही ऑनलाईन स्पर्धा  घे

त्या स्वतः फॅशन डिझाईनर आहे. स्वतंत्रपणे कपड्याचे दुकान चालवतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतः उत्तम ड्रायव्हिंग करतात. अशा सक्षम बाईला जेव्हा आजूबाजूच्या बायकांची बिकट अवस्था दिसायची तेव्हा त्या हळव्या  व्हायच्या.  नुसते हळवे होऊन चालणार नाही हे त्यांना लक्षात आले आणि त्यांनी या महिलांसाठी  पाऊल पुढे टाकले ते म्हणजे कणखरतेचे.  त्याच्या लक्षात आले की फक्त बायकांचे सांत्वन करून काम भागणार नाही ,तर त्यांना मनाने घट्ट करून पायावर उभे करणे फार गरजेचे आहे. “अतिशय व्यस्त असतानाही हा मोलाचा वेळ दुसऱ्यांसाठी कसा काय काढता?”हा प्रश्न विचारल्यावर त्या हसून म्हणाल्या,” आवड तीथे सवड.

बायकांना कित्येक गोष्टी आवडतात ;पण ती आवड आपल्या आयुष्याचा एक भाग होऊ शकते, असं न समजता फक्त दुसऱ्यांसाठी झटायचे, जगायचे, आणि मरायचे एवढेच बायकांनी आपल्या मनावर कोरून ठेवलेले आहे.आणि अश्वथामाच्या जखमेसारखी ही सल चिघळत असते.आणि यातच त्यांचं आयुष्य संपून गेलेले असते ही सल त्यांना फार बोचत गेली आणि म्हणूनच ‘ती’ साठी त्यांनी काम करणे सुरू केले. त्याला नाव दिलं ‘ती फाउंडेशन’. त्यांचं सगळं विश्व त्या ‘ती’ च्या भोवती फिरायला लागलं. ‘ति’ची सगळी काळजी, ‘ति’च्या सगळ्या गरजा, ‘ति’चे सगळे प्रश्न ,आणि ‘ति’च्या प्रश्नांना संपूर्णपणे उत्तर इथपर्यंत काम करायचं वैशालीने ठरवले. त्यांची  आई याच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे ते बाळकडू त्यांच्या रक्तातच होते. सामाजिक क्षेत्राचा वारसा तर होताच मात्र घरात बरीच लोक असूनही सगळ्यांचा पाठिंबा  आहे ही जमेची बाजू त्यांच्या आयुष्यात आहे. वैशाली पाटील या बायकांचा आधार बनल्या आणि शेवटी ‘ती फाऊंडेशन’ चे नाव त्याने ‘कुसुमवत्सल फाउंडेशन’  असे ठेवले. त्याच्या मागची फार रंजक कथात्यांनी सांगितले ,”सासुबाई कुसुम आणि वत्सला ही आई. या दोन्ही बायकांनी माझ्यावर  विश्वास दाखवला आणि त्यांचीच परतफेड म्हणून मी या सगळ्या बायकांसाठी झटते  आहे. ज्यांच्याकडून हा आदर्श घेतला त्यांची भूमिका आयुष्यभर वठवायची आहे,” असा विचार करून ‘कुसुमवत्सल फाउंडेशन’ हे नाव त्यांना समर्पक वाटले. त्यांच्या नावाच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालून यावी ही त्यांची प्रामाणिक इच्छा!

वैशाली उत्कृष्ट ड्राइविंग करू शकतात. कुठे साधा अपघात झाला तरी  न डगमगता त्या घटनास्थळी जातात आणि अपघात ग्रस्ताची मदत करतात . 

याच काळामध्ये या बायकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठीआणि मनावरची मरगळ झटकून  पुन्हा मनाने ताजतवाने होण्यासाठी ‘महाराष्ट्रा ची सौभाग्यवती’ ही स्पर्धा आयोजित केली. बायकांच्या आयुष्यभराच्या बकेट लिस्ट मध्ये जे जे राहिले ते त्यांच्याकडून करून घेतले. दोन महिने अव्याहत ही स्पर्धा चालली .८० स्पर्धांमधून तीस  उत्कृष्टस्पर्धक काढल्या केले;ज्यात  वयाचे,उंचीचे,रंगाचे ,शिक्षणाचे कुठलेच बंधन नव्हते. अगदी शहरापासून गावापर्यंत बायकांनी यात भाग घेतला होता .घरात राहून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि फॅशन शो च्या माध्यमातून बायकांना फ्रेश ठेवण्याचे काम त्यांनी खुप जबरदस्त केले.

त्यांनी आणखी छान उपक्रम राबवला आहे तो म्हणजे महिला शाहीरांचा सत्कार. समाज कार्य करत असताना सुद्धा त्या त्या म्हणाल्या,” घर आणि समाज  या दोन्ही गोष्टी समान पातळीवर सांभाळायला पाहिजे ,कारण प्रत्येक घरापासूनच समाज निर्माण होत असतो “आणि याचं भान ठेवत त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतलेलं आहे. त्यांचे गुरुजी कासवा बाबा म्हणायचे “बैठ गई तो बैठ गयी, चलते रहना चाहिए ,”म्हणून ते नेहमी म्हणतात मला कायम चालायचे तेही चांगल्या वाटेवर; समाजकार्याच्या वाटेवर.

टॅलेंट फॅक्टरी हा एक नवा उपक्रम. महिलांमध्ये असलेले टॅलेंट या माध्यमातून पुढे यावे, त्यांना रोजगार मिळावा, स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा हीच टॅलेंट फॅक्टरीची कन्सेप्ट.

बिइंग वुमन जसे महिलांना साथ देत पुढे जात आहे अशाच धर्तीवर वैशाली पाटील काम करत आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Share :