Being Woman

आकाशदर्शन

‘आकाश दर्शनाला उपयोगी पडावी ‘

      आकाश दर्शनाला उपयोगी पडावी  अशी एक पद्धत  आकाश निरीक्षकांतर्फे  वापरण्यात येते . त्यायोगे कोणता तारा किंवा तारकासमूह कुठे बघायचा ते समजते.  ती पद्धत अशी –  समजा एखादा तारा उदाहरणार्थ, व्याध आपल्याला माहिती आहे . तर तो व्याधाचा तारा घडाळ्याच्या मध्यभागी समजून  एक वाजण्याच्या स्थितीला अमुक तारा आहे,  तीन वाजण्याच्या स्थितीला अमुक तारा आहे  असे सांगितल्यास बघणार्‍याला तो शोधणे सोपे जाते. तेव्हा आता इथून पुढे आपण हीच पद्धत वापरू या .

      आधी सांगितलेल्या घड्याळाच्या पध्दतीप्रमाणे आपण चित्रा या तार्याला केंद्रस्थानी ठेऊन आता आपण आसपासचे तारे आणि तारकासमुह बघुया.

     चित्रा तार्याच्या 3°clock position ला आहे हस्त तर 2°clock position ला आहे चषक.  आता चित्रेच्या 12°clock position ला येते ” सिंह ” रास. सिंह राशीतील महत्वाचा म्हणजे अल्फा तारा आहे ” मघा Regulus.”   ख्रिस्तपूर्व २५६ मध्ये रेग्युलस हे रोमन लष्कर प्रमुखाचे नाव होते. . डेनेबोला किंवा उत्तरा फाल्गुनी आणि अलगैवा नावाचे अजून दोन ठळक तारे या तारकासमुहात आहेत.

      आपल्याच भारतीय संस्कृतीत हा तारकासमुह सिंह म्हणून ऒळखला जातो असे नाही तर पर्शियन,  तुर्की,  सिरीयन,  हिब्रू,  बॅबिलोनियन इ.  संस्कृती मध्येही सिंह म्हणूनच ऒळखला जातो.  सूर्य या राशीत आला की नाईल नदीला पूर येणार म्हणून प्राचीन इजिप्शियन लोक  त्याची वाट बघत असत.  त्याच सुमारास त्या भागातले सिंह आपली तहान भागवण्यासाठी नाईल नदीवर येत असत.  हे बघून कोणा प्रतिभावंताने सिंहाची आक्रुती  या तार्यांवर बसवण्याचा प्रयत्न केला आणि तो जमलाही.

       या तारकासमुहात M105,  M96, 95, 66, 65 ही  M objects आहेत.

लीना दामले.

Share :