Being Woman

January 2024

नवीन वर्षात पदार्पण झालेले आहे .सर्वांना 2024 नवीन वर्षाच्या  हार्दिक शुभेच्छा!!
दरवर्षीप्रमाणे आपण नवीन वर्षाचे संकल्प करतो आणि विसरून जातो, माणसाचा तो स्वभाव धर्म आहे. बिइंग वूमनकडून श.क्यतो सगळे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो आणि ठरवलेले संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी नेहमीच संपूर्ण टीम काम करत असते. मागील वर्षी महिलांच्या बाबतीत काही चांगल्या घटना घडल्या. ३३% आरक्षण मिळाले, वर्ल्ड क्रिकेटमध्ये दोनवेळा महिला संघ विजयी झाला, असे अनेक नवनवीन रेकॉर्ड झाले गेले. बिइंग वूमन जे काम महिलांसाठी करते आहे त्याची दखल घेतली गेली. काऊ डिग्निटी फाउंडेशन तर्फे बिइंग वूमनला ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बिइंग बूमनचा दिवाळी अंक दरवर्षीप्रमाणे मोठ्या दिमाखात प्रसिध्द झाला. डॉ. गौरी कानिटकर, चित्रलेखा पुरंदरे आणि निलिमा क्षत्रिय यांच्याहस्ते प्रकाशन झाले. यावेळी वेगळ्या पद्धतीने अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला, दिवाळी अंकाला भरभरून प्रतिसाद मिळाला. देशभरातून खूप चांगला प्रतिसाद लाभला. यावर्षीचे बरेच संकल्प पूर्ण झाले आहेत असा मी म्हणेन, यावर्षी डिजिटल अंक प्रसिद्ध झाले. मार्च महिन्यात जागतिक महिला दिनाच्या अंकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एप्रिल, मे च्या अंकाना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी बिइंग वूमनचा व्हॉट्सप ग्रुप जमला आणि यात सुरुवातीला जवळजवळ २०० जणी समाविष्ट झाल्या, जुलै मध्ये बाईपण भरी देवाचा फ्री शो झाला. १७१ ग्रुप मेंबर सकाळी ८ वाजता जरीची साडी, नथ घालून थिएटरमध्ये शो साठी हजर होत्या. त्यानंतर मंगळागौर खेळाचे दोन मोठे इव्हेंट झाले. यात बायकांनी मनसोक्त मंगळागौरीच्या खेळांचा आनंद लुटला, दांडियाचा तीन दिवसांचा मोठा इव्हेंट टीम तर्फे घेण्यात आल्या, दर महिन्याला टीमची मिटिंग घेतली जाते. यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे..

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *