Being Woman

February 2024

नमस्कार फेब्रुवारीच्या या अंकात सर्वांचे स्वागत आहे. २०२४ च्या पहिल्या महिन्यात खूप महत्वाची घटना घडली. अयोध्येला भव्य सुंदर अशा राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली. करोडो लोकांची ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली. माझ्या सारख्या लोकांनी ९२ सालच्या दंगलीही पहिल्या आणि त्यानंतर २०२४ साली प्रतिष्ठापना सोहळाही पाहिला. यावरून एक गोष्ट मात्र नक्की की विजय हा सत्याचाच होतो आणि खरोखर जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर काहीही घडू शकते, एकजुटीचा विजय होतो. सर्वत्र सकारात्मक उर्जा भरलेली असल्याने चैतन्याचे वातावरण होते. एक सुंदर अभूतपूर्व अभूनुती आपण सर्वांनी अनुभवली आणि या सोहळ्याचे आपण साक्षीदार झाला.

यावर्षींची २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची झालेली परेड स्त्री शक्तीचं दर्शन घडवणारी होती. संरक्षण दलातील महिलांनी त्यांच्या साक्षीचे, शिस्तीचे एक अभूतपूर्व दर्शन घडवले. ही परेड बघताना अभिमानाने उर भरून आला होता.

या अंकात मराठी भाषा दिन लेख, प्रभा अत्र स्वरयोगिनी लेख, श्रीरामाचे जीवनाशी नाते, कोर्ट आणि बिया, फिटनेस, पुस्तक परीक्षण असे विविध लेख आहेत. दरवेळी अंकासोबत नवीन लेखक लेखिका जोडले जात आहेत. विजयश्री अभ्यंकर ही अशीच एक लेखिका, व्यवसायाने ती आर्किटेक्ट आहे. महिला आणि व्यवसाय हे तिच्या करिअरचे समीकरण उलघडणारा लेख यात आहे.

फेब्रुवारी महिना हा आपल्यासाठी अर्थात मराठी माणसासाठी खास आहे कारण या महिन्यात मराठी भाषा गौरव दिन आहे.

Share :