Being Woman

September 2022

बिइंग वुमनच्या अंकात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.
गणरायाचे आगमन झालेले आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दोन वर्षांनी आपण बंधनमुक्त सणवार साजरे करू शकत आहोत अगदी पहिल्यासारखे. मागच्या महिन्यात झालेला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा निबंधमुक्त असल्यामुळे जरा जास्त उत्साहात साजरा झाला. सर्वत्र दहीहंडीला खूप गर्दी जमली. लोकांनी खूप उत्साहात हा सण साजरा केला, परंतु जसे सगळे म्हणतात की वृद्ध आजारी, विद्यार्थी यांचा विचार करून हे उत्सव साजरे केले पाहिजेत.. कोणतेही सण, उत्सव साजरे करताना स्वयंशिस्त महत्त्वाची आहे.
या उत्सवाच्या काळातच काही व्यवसाय जास्त प्रमाणात होतात. वर्षभर त्यांचा तितकासा व्यवसाय नसतो. उदा. फुलं, फळं, मिठाई, नारळ, रंग, रांगोळी, फुगे, खाद्यपदार्थ अशा अनेक व्यावसायिकांचा दोन वर्षांत झालेला तोटा भरून निघावा, हो बाप्पाच्या चरणी प्रार्थना. या महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये આ વ कझागस्थान, आयरनमॅन भारताच्या खेळाडूंनी अनेक सुवर्णपदक जिंकली आहेत. भारताची शान उंचावली आहे. अश्विनी देवरे कझागिस्तानमध्ये आयरनमैन हा किताब मिळवणारी भारतातली पहिली महिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिशय खडतर अशा मानल्या जाणाऱ्या “आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी राज्यासह संपूर्ण देशाचे नाव चमकवले आहे. करणाच्या दोन मुलांच्या या आईने नाशिकला पोलीस खात्यात नोकरी दोन वर्ष रोजचा २०२२ तास सराव करून हे यश मिळवले आहे. बिडंग वुमनकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, बिडंग वुमनमध्ये आपण नेहमीच वेगळी कामगिरी केलेल्या महिलांचा उल्लेख करतो, त्यांच्या कामगिरीचा आढावा घेता अशाच एका महिलेबद्दल या अंकामध्ये उपसंपादक स्मिता गुणे यांनी एक लेख लिहिलेला आहे. 

Share :