'नेपाळ'
नेपाळ मधल्या एका खेडेगावातल्या जीवन शैली बद्दल बघितले पण इथे भेटलेली रत्ना तिच्या विषयी काही सांगावेसे वाटते . मी तिला सांगितले तुझी गोष्ट मी लिहू का ? त्यांना सगळ्यांना असे माहिती आहे कि मी एक पेपर काढते म्हणजे त्याला ते पत्रिका म्हणतात
रत्ना तिथल्या स्त्रियांची एक प्रतिनिधी म्हणू शकतो. असा नाही कि सगळ्याच स्त्रिया अशा आहेत .डॉक्टर्स आहेत ,मॅनेजर्स आहेत. शहरात सगळे आहे तिथेच माझ्या डोळ्याला झालेली इंज्युरी ला नेपाळगंज हॉस्पिटल मधली लेडी डॉ नंदा गुरांग Eye specialist ने उपचार केले
तिथे गेल्यानंतर आमच्याकडे काम करण्यासाठी बाई आली ती म्हणजे रत्ना. मी विचारलं की तुझ्या घरी कोण कोण असतं तर दोन मुलं आहेत. मोठ्या मुलीचे लग्न होऊन ४ वर्ष झालीत आणि म्हणजे तीन मुलं . मोठ्या मुलीचा नवरा तिला सोडून गेलेला आहे काठमांडू मध्ये ती नोकरी करते .आता करोना मुळे तिचे पण प्रॉब्लेम आहे .तिचे पण शिक्षण नाही . रत्नाचेही शिक्षण नाही.
तीन मुले झाल्यावर रत्नाचा नवरा पण तिला सोडून गेलाय.डिवोर्स वगैरे काही नाही. भारतात नोकरी करतो. आणि दुसऱ्या बाई बरोबर राहतो .शिक्षण फक्त ४थी पर्यंत तरी रत्नाने खूप ठिकाणी नोकऱ्या केल्या मुलाना आई वडीलां जवळ ठेवून ,मुंबई,लखनौ ,दोन वर्ष दुबई त्यामुळे घरातील कामाची नीट माहिती आहे .मॅनरस माहिती आहेत, स्वैपाक बनवायचे जसा पाहिजे तसा माहित आहे. पैसे साठवल्यावर शेती घेतली होती पण सासर्यांनी परस्पर विकून टाकली मग ५/६ वर्षां पूर्वी पुन्हा पैसे साठवून घर बांधले.घरी सगळे आहे टी व्ही ,मिक्सर , फ्रीज मुलांनी बिघडवला त्यासाठी नेहमी सांगत असते .
हळू हुळू ३ महिन्यात गप्पा मारता मारता सगळे तिने सांगितले
माझ्या कडे नोकरी आहे आणि बाकी शेळ्या बकरी पाळून काही पैसे मिळतात पण मुलांच्या डिमांड जास्त असतात . चांगलया मोबाईल पाहिजे ,टी व्ही केबल , पाहिजे .लाईट बिल खूप येते ,
दिवसभर कष्ट करत असते ,तिच्या मोबाईलची पूर्ण वाट लावली आहे मुलांनी गेम खेळून ,त्यांच्या मागण्या संपातच नाहीत. लॉक डाउन मध्ये तिथे खूप उन्हाळा होता. मुलांनी उन्हात जाऊन काही उपद्याप करू नायरत म्हणून कॅरम आणला भारीतला. सतत मुलाचा विचार चालू असतो तिचा .
नेपाळ मध्ये व्दिभार्या प्रतिबंधक कायदा दोन वर्ष पूर्वी आला तो पर्यंत एक बायको असताना दुसरे लग्न करून राहायचे जर घटस्फोट हवा असेल तर बरेच कंलिकेशन्स होते . मी तिला नेहमी विचारायची कि तू मुलांच्या खर्च साठी नवऱ्या कडून पैसे का नाही घेत ? शाळेची फी भरली नाही म्हूणन शाळेत जात येत नाही. त्यात लोक डाऊन मुळे अजूनच. नेमके डिसेंबर २०२० मध्ये आम्ही तिथे गेलो आणि रत्ना ला आमच्या कडे नोकरी मिळाली रोज सकाळी जेव्हा सांगेन तेव्हा यायचे .सकाळच्या चहा पासून रात्री स्वैपाक करायचा. घरी ४ वाजताच उठून बकऱ्याचे खाणे बनवणे ,गवत आणणे, घरासमोर शेती आहे तिचे काम करणे , मग ७ वाजता आमच्या घरी. .पुन्हा ९.३० पासून गवत काढणे.,परत १२.३० ला ते २ आमच्या घरी दुपारचा स्वैपाक . तरी तिची मुलगी घरी स्वैपाक कराते , घर साफसफाई करते. एकही दिवस सुट्टी नाही. एखादे दिवशी स्वैपाकात गडबड झाली कि मी विचारते ” आज काय टेंशन ? मग तिचे उत्तर असायचे “आज नवऱ्याने फोन केला .मी नेपाळ ला येतो ” मग ती म्हणायची याला खायला कुठून घालू ? ” किंवा लाईट बील आले भरले नाही .लाईट कट झाली.
आई वडिलांचा, बहिणीचा थोडा आधार आहे . पण एकंदरीत मला सगळे वागणे पटायचे नाही. मुलगी १६ वर्षाची आणि मुलगा १२ वर्षांचा . तिच्या मुलीचे म्हणणे आहे कि ती मोठ्या बहिणी सारखी आणि आई सारखी जाड नाही होणार . केटरिंग शिकणार. लवकर लग्न करणार नाही.
वरील सगळे वाचून असे लक्षात येते कि तिथे लग्न खूप लवकर होतात, अगदी १४/१५ वर्ष मुलींची आणि १८/१९ ला मुलांची , मुले लवकर होतात ,नंतर पुरुष बायकोला सोडून जातात ,दुसऱ्या बाई बरोबर लग्न हि करतात .पण मुलांची जबाबदारी बाईचीच. अशा खूप लहान मुली पहिल्या . मी म्हणायची वो छोटी बच्ची आयी थी . मग रत्ना मला माहिती पुरवायची ” बच्ची कहा मॅडम उसके तो २ बच्चे है.७ और ८ सालके . उसके आदमी ने छोड दिया उसको , अब कॅन्टीन मे काम करती है “. असे तिने ४/५ मुलींच्या बद्दल सांगितले.
त्या छोटया खेडेगावातल्या मुली पार्लर चालवतात .शेतीची कामे करतात ,भाज्यांचे दुकाने चालवतात ,
दुकानात सगळेजण काम करतात.
काही प्रमाणात आपल्याकडे पण हि परिस्थिती आहे पण त्यांना कायद्याचा आधार आहे .रत्नाला पण हा आधार मिळू शकतो त्यांच्या देशात आता कायद्याचे पाठबळ आहे .नवीन मुलींना हे मिळते. बदल घडतो आहे तरीही एक एकटी बाई मुलांना कष्ट करून वाढवते. नवऱ्याने सोडले तरी कुठेच तक्रार करत नाही. रोज भांगात सिंदूर भरते ,घामाने तो सिंदुर र कपाळ भर पसरतो तेव्हा मीच तिला सांगते अग आरशात बघ जो तुला सोडून गेलाय तयाच्या नावाचा सिंदूर कपाळ भर झालाय. मंगळसूत्र घालते . सुंदर दिसण्यासाठी जे काही आहे ते करतेच . तर एका स्त्री ची गोष्ट मला नेपाळच्या स्त्रियांच्या बाबतीतच नाही सर्व स्त्रियांची प्रतिनिधिक वाटते.