'नोकरीच्या कथा'
माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफिस मध्ये केलेल्या नोकऱ्या आणि तिथले अनुभव.
माझ्या सगळ्या नोकर्या एंटरटेनमेंट क्षेत्रातल्या होत्या . माझी पहिली नोकरी मुंबई रेस कोर्स ला होती आमच्या ओळखीच्या एक बाई होत्या आणि त्यांनी मला विचारलं की तुला चालेल का रेस कोर्स ला जॉब . मला दुसरी कडे जॉब तर नव्हताच आणि त्यावेळी जास्ती नोकरीच्या संधी पण नव्हत्या तर मी म्हटलं बघूया तरी कसा असेल रेसकोर्सचा जॉब म्हणून मी पहिल्या दिवशी रेस कोर्स ला गेले तिथे गेल्यावर ती पाहिलं तर माझ्यासारख्या बर्याच जणी होत्या तिथे कॉलेजमधल्या मुली होत्या,नोकरी करणारे पुरुष होते कारण ही नोकरी होती फक्त आठवड्यातून तीनच दिवस काम असायचं गुरुवार आणि शनिवार आणि रविवार.
पहिल्या दिवशी ओळख करून दिली. वेळ मात्र न्युज पेपर मध्ये बघून कळायची. कारण पहिली रेस किती वाजता सुटणार हे पेपर मध्ये यायचे, याप्रमाणे दोन तास आधी रेसकोर्स ला पोचायचे.
पहिल्या दिवशी चे ट्रेनिंग नंतर मला समजले की आपण काय करायचं? आपण समोर आलेल्या माणसाकडून पैसे आधी पैसे घ्यायचे मग त्याला विचारून घ्यायचं कोणते तिकीट पाहिजे मग ते कार्ड वर पंच करून द्यायचे . त्यापवेळी पंचिंग मशीन होती. कॉम्पुटर नव्हते. तेव्हा वेगवेगळ्या रेस वर पैसे लावायचे लोक. तीन रेसेस मधले ३ घोडे असतील तर ते तनाला मागायचे मग कार्ड वर पंच करून द्यायचे. आधी पैसे का ? कारण बऱ्याच वेळेला आधी कार्ड घेऊन पैसे दिले असे फसवणारे खूप लोक असायचे म्हणून खबरदारी. हातात पैसे आले कि ते ड्रॉवर मध्ये पैसे ठेवायचे आणि ते ड्रॉवर बंद ठेवायचे ठेवायचे. अकाउंटंट फिरत राहायचा.तो पैसे गोळा करायचा. तिथे एका कागदावर लिहून घ्यायचा की मी एवढे पैसे घेतले . पहिल्या दिवशी मला काही खूप काम नव्हतं पण नंतर मग दुसऱ्या दिवशी मी काम केलं कारण मग एका साईडचा टेबलावर बसवायचं नवीन आलेल्यांना ट्रेनिंग साठी त्यामुळे तुम्ही आधी पैसे द्यायचे मग तिकीट करायचं तिथे लक्ष ठेवायला कोणीतरी बसायचे जवळ. फसवू नये म्हणून . कारण तिकीट घेणारे पण नवीन आलेल्या कडे जायचे . मग चुकले कि भांडं भांडी व्हायचीच. पैसे शॉर्ट आले तर त्याच्या पगारातून काढून घ्यायचे आणि रोजच्या रोज घरी जाताना पगार मिळायचा . तसे पैसे बरे मिळायचे .मी जाताना येताना टॅक्सी करायची कारण जे जे पासून एकच ऐतिहासिक बस होती १२४ नंबर ची कधीच वेळेत नसायची , नंतर अजून एक सुरु झाली १२५ नंबर ची. मी दोन सिझन तिथे नोकरी केली मी एक्स्पर्ट झाल्यावर मला मेंबर्स मध्ये सेलर म्हून जायला मिळाले. Turf क्लब चे मेंबर्स त्यामध्ये सिने स्टार्स यायचे फिरोझखान, बिंदू, रवि शात्री असायचा त्याचे वडील पण नेहमी असायचे .बाहेर ऑडी दिसली सगळे सांगायचे रवी शास्त्री आलाय. खूप अदबीने वागायला लागायचे ,उलटे उत्तर नाहि. इथे लोक सुटे पैसे परत घ्यायचे नाहीत .चेन्ज तशीच ठेवायचे मग पगारापेक्षा जास्त रक्कम मिळायची. जॅकपॉट च्या दिवशी तर प्रचंड गर्दी असायची .त्यादिवशी पैसे शॉर्ट आले तरी कट नाही करायचे ,मेंबर्स मधले कॅन्टीन खूप छान होते. आमच्या इथे एक ऑस्ट्रेलियन मॅनेजर जो नाव होतं त्याचे , वयस्कर .नेहमी सांगायचा “‘ you should have beer .beer cleans your kidneys ” जॅकपॉट च्या दिवशी शेवटची रेस सुटायच्या आधी आम्ही रेस बघायला जायचो . कारण शेवटी गर्दी नसायची.खूप वेगळा अनुभव होता नोकरीचा . खूप एन्जॉय केले , मित्र मैत्रिणी झाल्या.
तशी माझी ही पहिली नोकरी होती.
मग आम्ही पुण्याला आलो पुण्याला आल्यावर ती सहज विचारलं की पुण्याला पण रेस कोर्सला जॉब मला मिळू शकतो का ? कारण अनुभव होता . मी गेले तर त्यांनी लगेच सांगितलं या जॉईन व्हा . पुण्याच्या रेसेस पावसाळ्यात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये असतात. आणि मी पुणे रेसकोर्स ला जॉईन झाले . इथे एक सिझन झाला पंचिंग मशीन वर . इथे कॉम्प्युटर आले आणि त्याचे ट्रैनिंग झाले आणि तिकीट सेलिंग कॉम्प्युटर वर व्हायला लागले आणि प्रिंट आउट देता आल्यामुळे खूप सोपं झालं. पुण्याचे मी तीन सिझन केले. खूप मित्र मैत्रिणी झाल्या खूप लोकांच्या ओळखी झाल्या . मुंबईच्या जॅकपॉट च्या दिवशी खूप गर्दी असायची मुंबईला आम्हाला बोलावून घ्यायचे ते. एकदा आम्ही चौघी मैत्रिणी मुंबईला गेलो होतो . एक दिवस डबल पैसे मिळाले आणि त्या वेळेची रेस लवकर सुरू व्हायची त्या दिवशी खूप मजा असायची. माझे जुने ओळखीचे लोकं भेटले .ते सगळे वाटच बघत होते.
खरं सांगायचे तर रेसकोर्स हे वेगळं जग आहे . यात आपण कुठेच बसत नाही, म्हणतात तसं हा जुगारच आहे . आम्हाला कधी कधी टिप्स मिळायचा कि हा घोडा फेव्हरिट आहे पैसे लावा ,मग मी १० रुपये लावायची पण कधीच तो घोडा यायचा नाही .दुसऱ्या रेस ला नक्की फेव्हरिट घोडा यायचा तेव्हा मी पैसे लावलेले नसायचे .
जिंकलेल्या रेस चे पैसे घ्यायाला मोठी गर्दी व्हायची , पेमेंट ला अनुभवी लोकच असायचे .
आता रेसकोर्स सगळे बदलले आहे आता रेस कुठेही बघू शकतो बेटिंग करू शकतात पण रेसकोर्स जाऊन बघण्याची मजा वेगळीच.