Being Woman

Mindful Shortz

बिइंग वुमन आणि माईंड फुल शॉटझ आयोजित सेमिनार Let’s Go

शनिवार दिनांक १३ मे रोजी  बिइंग वुमन आणि माईंड फुल शॉटझ यांनी Let’s Go  या विषयावर सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनार मध्ये Let’s Go म्हणजे काय? काही गोष्टी सोडून न दिल्यामुळे आणि त्या मनातच ठेवल्यामुळे मनावर येणारे ताण-तणाव याविषयी माहिती सांगण्यात आली. सोडून देणे म्हणजे नक्की काय आणि ते कसे सोडून द्यायचे ही माहिती निरनिराळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन त्यातून सोप्या पध्दतीने दाखवून दिली. या सेमिनारला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकजणींनी त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्या स्वतःसाठी काही क्षण जगल्या.

बिइंग वुमन असे सेमिनार दर महिनयाला घेत आहे. बिइंग वुमन चा हा ३रा सेमिनार आहे. महिलांना स्वतःसाठी थोडा वेळ देता आला पाहिजे. त्यांच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून या सेमिनारचे आयोजन केले जातं आहे. पुढील सेमिनार १० जून रोजी anxiety या विषयावर आहे.