Being Woman

May 2023

बिइंग वुमनच्या डिजिटल अंकात सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपल्या आवडत्या लेखिका सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण टीम बिइंग वुमनतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसात आंबे, कैरीचे विविध चव वाढवणाऱ्या पदार्थाची लयलूट सध्या सुरू झालेली आहे. मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्याने सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. प्रत्येकाने आयुष्यात उन्हाळी सुट्टीमधील लहानपणापासूनच्या आठवणी जपलेल्या आहेत. या उन्हाळी सुट्टीत आपल्या आठवणीत रममाण होऊयात. या अंकात काही लहान मुलांचे लेख आले आहेत. त्यांच्या सुट्टीच्या संकल्पना बदलल्या आहेत पण उत्साह तोच आहे. त्यांच्याच शब्दात सुंदर वर्णन केलं आहे.
या अंकात प्रिया फुलंब्रीकरचा नाविन्यपूर्ण विषयावरील वसंत ऋतूतील या निसर्गाच्या खेळाकडे आपण डोळसपणे पाहू शकतो. तिने जे केलेले वर्णन फुलांची नावे, रंग, पक्षांची नावे आणि त्यांची मध खाण्यासाठी होणारी हालचाल याचे वर्णन केले आहे.
मार्च महिन्यांमध्ये बिइंग वुमनने माईंड फुल शॉट्स यांच्याबरोबर एक सेमिनार आयोजित केल होत. या सेमिनारला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. तिथे घेतलेल्या ऐक्टिव्हिटीमुळे जमलेल्या प्रत्येकीला खूप मनमोकळे झाल्यासारखे वाटले. २४ तासातील २ तास असे स्वतः साठी काढणे किती आवश्यक आहे याची जाणीव प्रत्येकीला झाली. बिग वुमन दर महिन्याला असंच विविध विषयांवर एक सेमिनार घेणार आहे तरी सर्वांनी त्याचा नक्की लाभ घ्या.
आठ मार्चच्या महिलादिन विशेष अंकामध्ये वेगळा व्यवसाय करणान्या स्वियाविषयी लेख घेतले होते यामध्ये मनीषा पाध्ये यांचे गॅरेज आहे संपादकीय…..

Share :