Being Woman

Jun 2023

बिइंग वुमन जूनच्या अंकात सर्वांचे स्वागत बिइंग वुमन म्हणून आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या वेळी UPSC परिक्षेत महिलांना भरघोस यश मिळाले आहे. परीक्षेत यशस्वी झालेल्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
जून महिन्यात अनेक गोष्टी नव्याने सुरू होतात. शाळा, कॉलेजे सुरू होतात. नवी पुस्तकं, नवीन मित्र मैत्रिणी भेटतात. कदाचित गोष्टी जुन्याच असतात पण पुन्हा एकदा नव्याने भेटतात, पर्जन्य ऋतू पाऊस सुरू होतो. उन्हाळ्यापासून सुटका होते. आपली अनेक वर्ष परंपरागत चालू असणारी पंढरपूरची वारी देखील याच महिन्यात येते.
या अंकात जागतिक बायसिकल दिनाच्या निमित्ताने आनंद वांजपे यांचा सायकलिंग करणे कसे फायद्याचे आहे असे न सांगता सायकलिंगमुळे तुम्ही कसे पुन्हा तरूण होता, मानसिक आणि शारीरिक फिटनेस कसा वाढतो हे सांगणारा आगळा-वेगळा लेख आहे. या लेखपासून आपण फिटनेस साठीची एक लेखमाला सुरू करत आहोत. आपला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पर्यावरण यासाठी फार काही करायची गरज नाही. आपल्या घरापासूनच पर्यावरण जपण्यासाठी काय आणि कसे सुरू करता येईल हे सांगणारा प्रिया भिडे यांचा लेख ‘गची वरील फुलबाग’ आहे. त्याचे प्लॅस्टिकचा वापर कमी करणे यावरही खूप काम चालू आहे. या विषयी देखील हळूहळू जाणून घेणारच आहोत.
यावेळी अंकात भरपूर वाचनीय लेखाचा समावेश आहे. अशाच काही लेखांचा उल्लेख
करावा लागेल तो म्हणजे केल्याने देशाटन हा लेख. यात ट्रॅव्हल कंपनी चालवत असताना येणारे अनुभव प्रशांत पाटणकर यांनी पाठवले आहेत. आजकाल शाळेची एडमिशन आणि मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चावर, शिक्षण पध्दतीवर प्रकाश टाकणारा अभ्यासपूर्ण लेखही आहे. 

Share :