July 2023
सवाँचे जुलै महिन्याच्या या अंकात जगात जुलै महिना तसा शांत जाणारा महिना… म्हणजेच सण नाहीत की लप्र सराई नाही तशी शांतताच. बिइंग वूमनने एक इव्हेंट अरेंज केला. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा शो ठेवला होता आणि जवळजवळ १७१ बायकांनी हा शो पाहिला. सकाळची वेळ असल्याने जरा येतील की नाही शंका होती पण शो announcement केली आणि काही तासातच शो हाऊसफुल झाला. सकाळी सकाळी ९ वाजताच्या शो ला सगळ्याजणी मस्त नटून थटून नथ, गॉगल, शेला अशी थीम करून आल्या होत्या. शो सुरू होण्याआधी मंगळागौरीचे खेळ खेळल्या. गाणी म्हटली. भरपूर एन्जॉय केले. चंदूकाका सराफ हे या शोचे मुख्य प्रायोजक होते, त्यांना सर्वांनीच विशेष धन्यवाद दिले. या उपक्रमाचे प्रचंड कौतुक झाले. कोणाला कोणाची जुनी मैत्रीण भेटली तर कोणाचा मैत्रिणींचा नवीन ग्रुप तयार झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आम्ही खूप सुखावलो. आलेल्या सगळ्या मैत्रिणींना आमच्याकडून धन्यवाद, अंकात या सोहळ्याची क्षणचित्रे आहेत.
या वेळीही वेगवेगळे विषय घेऊन अंक आला आहे. मैत्रीचे बंध उलगडणारा लेख, खजुराहो वरचा अभ्यासपूर्ण लेख आहे. याशिवाय या महिन्यात आलेली गुरुपौर्णिमा आणि आपले नेहमीचे OTT platform वरच्या मालिका आणि सिनेमांची ओळख करून देणारं सदर आहेच. कटहल या सिनेमाचे परिक्षण आहे. ठरवले तर वयाच्या कोणत्याही टप्प्यात ध्येय
साध्य करता येते हे सांगणारा yes did it लेख आहे. अतिशय सुंदर पक्षी निरीक्षण यावेळच्या अंकात आहे.