Being Woman

December 2021

तत्कालीन कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत राज्यघटनेच्या मसुद्याला दिशा दिली.घटना समितीच्या प्रमुख चर्चामध्ये त्यांचा सहभाग होता.घटना समितीत महिलांचे योगदानही मोठे होते.तेव्हा आजच्या ६९ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त (२६ नोव्हेंबर १९४९) अशा कर्तृत्ववान महिलांचे स्मरण करणे गरजेचे आहे…
१) अम्मु स्वामीनाथन : केरळमधील पालघाट जिल्ह्यातील उच्च जातीच्या हिंदू कुटूंबात जन्म झालेल्या स्वामीनाथन मद्रास मतदारसंघातून संविधान सभेच्या सदस्य होत्या.
२) दक्षिणाणी वेलयुद्धन : कोचीन मतदारसंघातून संविधान सभेवर आलेल्या दक्षिणाणी वेलयुद्धन ह्या एकमेव दलित महिला होत्या.
३) बेगम अजाज रसूल : उत्तरप्रदेशच्या राजकारणावर विशेष छाप असलेल्या बेगम अजाज रसूल ह्या संविधान सभेवर आलेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते.
४) दुर्गाबाई देशमुख : सन १९७५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविलेल्या दुर्गाबाई देशमुख ह्या तरूण वयापासूनच सत्याग्रह चळवळीत सहभागी होत्या. सन १९३६ मध्ये त्यांनी आंध्र महिला सभेची स्थापना केली. त्या लोकसभेच्या सदस्य होत्या.
५) हंसा जीवराज मेहता : सन १८९७ रोजी जन्मलेल्या हंसा यांनी इंग्लंडमध्ये पत्रकारिता आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास केला होता. १९४५-४६ मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या.

Share :