Being Woman

August 2023

या अंकात सर्वांचे मनापासून स्वागत. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
अधिकमास आणि त्यात पुढे येणारा श्रावण महिना. ‘अधिकस्य अधिकं फलं’ नुसार दान हे श्रेष्ठ दान आहे. या अंकात अधिक मासाची माहिती सांगणारा लेख प्रज्ञा कुलकर्णी यांनी लिहिला आहे. डॉ. अनघा हिंडलेकर यांची शास्त्रीय संगीतात पी.एच.डी. असून शास्त्रीय संगीताचा प्रसार करणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांनी शास्त्रीय संगीत विषयावर सुंदर लेख दिला आहे. या अंकात अनेक नवनवीन लेखिकांचे लेख आहेत. ज्यांना लिहिण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी बिइंग वूमनचे हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश एक एक पाऊल पुढे जात आहे. आमच्या व्हॉट्सअँप पुपबरोबर ४०० पेक्षा जास्त मेबर कनेक्ट झाले आहेत. बिझिनेस आणि विचारांची देवाणघेवाण किंवा एखादा अनुभव लिहून पाठवला जातो. काही जणींना नवीन मैत्रिणी मिळाल्या आहेत. एकंदरीत काय बिइंग वूमनला नवीन लेखिका आणि वाचक वर्ग जोडला जातो आहे.
यावेळी आलेला पाऊस हा हिमालयातील राज्यांचे नुकसान करतो आहे. पण निसर्गाची आपण काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेतो हेच यातून शिकायचे. जगभरात पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. जागतिक स्तरावर याचे प्रबोधन चालले आहे. आपले पर्यावरण आपणच वाचवले पाहिजे ती काळाची गरज आहे.
सध्या मी नेपाळमध्ये आहे. इथे याचा श्रावण सुरू झाला होता सगळ्या बायका, मुली सगळ्यानी मेदी लावली होती आणि हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. 

Share :

1 thought on “August 2023”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *