Being Woman

बाईपण भारी देवा

खास महिलांसाठी बिइंग वूमन तर्फे बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या शो चे कोथरूड सिटी प्राईड येथे आयोजन केले गेले होते. यात जवळपास 171 महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी सकाळी साडी, नथ असा पारंपरिक पेहराव करून सर्वजणी उपस्थित राहिल्या होत्या. प्रत्येकीचा उत्साह हा वाखण्याजोगा होता. शो सुरू व्हायच्या आधी फुगडया घातल्या, फेर धरला अशी भरपूर धमाल सगळ्यांनी केली. प्रत्येकीला भावणारी ही कथा असल्याने सर्वांनीच या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी चंदूकाका सराफ यांचे सहकार्य लाभले.